शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: इस्लामपूर मतदारसंघासाठी भाजप-शिवसेनेत रस्सीखेच, जयंत पाटील यांच्याविरोधात उमेदवार कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2024 18:29 IST

आनंदराव पवार यांचा दावा कायम, निशिकांत पाटील यांचीही जोरदार तयारी

अशोक पाटीलइस्लामपूर : इस्लामपूर मतदारसंघासाठी भाजप-शिवसेनेमध्ये जाेरदार रस्सीखेच सुरू आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार मुंबईत तळ ठोकून आहेत. तर गौरव नायकवडी यांच्याही मुंबई वाऱ्या वाढल्या आहेत. कोणत्याही परिस्थितीत इस्लामपूर मतदारसंघ शिवसेनेसाठीच आहे. असा पवार यांचा दावा आहे. दुसरीकडे भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनीही उमेदवारीसाठी चौफेर फिल्डिंग लावली आहे. जिल्हा बँकेचे संचालक राहुल महाडिक यांनीही छुपी यंत्रणा राबविली आहे.इस्लामपूर मतदारसंघात विकास कामांच्या उद्घाटनावरून आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील आणि शिवसेनेचे गौरव नायकवडी आघाडी उघडली आहे. दोघांनीही महायुतीच्या उमेदवारीवर दावा केला आहे. शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष आनंदराव पवार यांनी मुंबईत तळ ठोकून आहेत. इस्लामपूर मतदारसंघात परत येताना आपण उमेदवारी घेऊनच येऊ, असा त्यांचा दावा आहे. दुसरीकडे गौरव नायकवडी यांनीही वाळवा येथील विकास कामांच्या उद्घाटनावरून जयंत पाटील यांना काळे झेंडे दाखवत विरोध केला आहे. आपणच मतदारसंघात शिवसेनेकडून दावेदार असल्याचा अप्रत्यक्षपणे नायकवडी यांनी दुजोरा दिला आहे.एकंदरीत आगामी विधानसभेच्या रणांगणात आमदार जयंत पाटील यांनी आपली फौज इस्लामपूर मतदारसंघात उतरवली आहे. कार्यकर्त्यांच्या माध्यमातून इस्लामपूर-आष्टा परिसरात मंजूर झालेल्या विकास कामांच्या उद्घाटनांचा श्रीगणेशा केला आहे. याउलट महायुतीकडून शिवसेनेचे खासदार धैर्यशील माने, गौरव नायकवडी यांनीही विकास कामांची उद्घाटने करत आमदार जयंत पाटील यांना आव्हान दिले आहे. त्यातच आता भाजपचे जिल्हाध्यक्ष निशिकांत पाटील यांनी मतदारसंघात विकासाचे पर्व सुरू करून उद्घाटनांचा कार्यक्रम हाती घेतला आहे. त्यामुळे सध्यातरी आमदार जयंत पाटील यांच्याविरोधात महायुतीकडून उमेदवार कोण असणार? याबाबत अनिश्चितता आहे.

सध्या आपण मुंबई येथे तळ ठोकून आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी इस्लामपूर दौऱ्यातच तयारीला लागा असा आदेश दिला आहे. त्यामुळे मतदारसंघ शिवसेनेकडेच राहणार आहे. शिवसेनेची उमेदवारी आपणासच मिळणार आहे. इस्लामपुरात परतताना उमेदवारी घेऊनच येऊ. - आनंदराव पवार, जिल्हाध्यक्ष, शिवसेना

टॅग्स :Sangliसांगलीislampur-acइस्लामपूरvidhan sabhaविधानसभाElectionनिवडणूक 2024Jayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाShiv Senaशिवसेना