राहुल गांधी यांच्याविरोधात सांगलीत भाजपची निदर्शने, निषेधाच्या घोषणा
By अविनाश कोळी | Updated: March 25, 2023 15:54 IST2023-03-25T15:54:03+5:302023-03-25T15:54:45+5:30
सांगली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या जातीवाचक व अपमानस्पद वक्तव्याविरोधात सांगलीत भाजप ...

राहुल गांधी यांच्याविरोधात सांगलीत भाजपची निदर्शने, निषेधाच्या घोषणा
सांगली : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात केलेल्या जातीवाचक व अपमानस्पद वक्तव्याविरोधात सांगलीत भाजप ओबीसी मोर्चाच्या वतीने ‘राहुल गांधी माफी मांगो’ आंदोलन करण्यात आले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. जिल्हा प्रशासनाला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पंतप्रधान हे ओबीसी समाजाचे आहेत. त्यांचा अपमान म्हणजे समस्त ओबीसी समाजाचा अपमान आहे. ओबीसी समाज हा अवमान सहन करणार नाही. राहुल गांधी यांनी देशातील संपूर्ण समाजाची माफी मागावी, अशी मागणी करण्यात आली.
आंदोलनास भाजपचे प्रदेश सदस्य शेखर इनामदार, ओबीसी मोर्चाच्या राष्ट्रीय सदस्य संगीता खोत, माजी आमदार दिनकर पाटील, ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अमर पडळकर, प्रदेश सचिव जयगोंड कोरे, नगरसेविका कल्पना कोळेकर, सविता मदने, अप्सरा वायदंडे, आदी उपस्थित होते.