शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
2
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
3
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
4
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
5
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
6
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
7
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
8
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
9
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
10
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
11
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
12
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
13
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
14
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
15
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
16
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
17
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
18
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
19
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
20
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
Daily Top 2Weekly Top 5

भाजप आमदार गोपीचंद पडळकरांच्या भावाची दहशत, मिरजेत मध्यरात्री जेसीबीने दुकाने केली जमीनदोस्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2023 12:14 IST

दुकानदार व झोपडपट्टीधारकांची पडळकरांसोबत  जोरदार वादावादी, हाणामारीत एक दुकानदार जखमी

सदानंद औंधेमिरज : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांच्या भाऊ ब्रम्हानंद पडळकर यांच्यासह दीडशे जणांच्या जमावाने मिरजेत मध्यरात्री चार जेसीबीच्या साह्याने बसस्थानकाजवळ अमर थिएटर समोर दहा दुकाने जमीनदोस्त केली. यामध्ये एक कोटी तेरा लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार असून या घटनेमुळे शहरात तणाव निर्म‍ाण झाला होता. याप्रकरणी  विशाल दिलीपराव सन्मुख यांनी ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह दीडशे जणाविरुद्ध मिरज शहर पोलिसात फिर्याद दिली आहे.मिरज शहरातील छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर दुकाने व त्यामागे खाजा झोपडपट्टीच्या जागेचा वाद सुरु आहे. ही जागा ब्रह्मानंद पडळकर यांनी खरेदी केल्याचे सांगण्यात येते. पडळकर यांनी ही जागा मोकळी करण्यांसाठी संबंधित दुकानदार व रहिवाशांकडे यापूर्वी अनेकदा प्रयत्न केले होते.  

परंतू जागा रिकामी करीत नसल्याने वाद सुरु होता. मिरजेत शनिवारी मध्यरात्री ब्रह्मानंद पडळकर यांच्यासह दोनशे जणांच्या जमावाने चार जेसीबीसह येऊन  रस्त्यावरील दुकाने पडण्यास सुरुवात केली. यावेळी दुकानदार व झोपडपट्टीधारकांची पडळकरांसोबत  जोरदार वादावादी झाली. यावेळी हाणामारीत मोहम्मद लियाकत सय्यद हा दुकानदार जखमी झाला आहे.दुकाने पडल्यानंतर  पडळकर समर्थकांनी मागे असलेल्या झोपडपट्टीकडे मोर्चा वळविला. यावेळी झोपडपट्टीवासियांनी पडळकर  समर्थकांवर जोरदार दगडफेक करीत प्रतिकार केला. जेसीबी व पडळकर समर्थकांच्या गाड्यांचीही तोडफोड केली. यात एक कोटी तेरा लाखांचे नुकसान झाल्याची तक्रार  आहे.  

याबाबत माहिती मिळताच मिरज शहर,  गांधी चौक व स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दुकाने व घरे पाडण्यासाठी वापरलेल्या चार जेसीबी पोलिसांनी  जप्त केल्या आहेत. या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली होती. संतप्त झोपडपट्टीधारक व  दुकानधारकांनी पडळकर समर्थकावर कारवाईची  मागणी केली.

टॅग्स :SangliसांगलीGopichand Padalkarगोपीचंद पडळकरCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस