शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सामान्य मेंढपाळांच्या हस्ते आम्ही अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन करणार- गोपीचंद पडळकर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2022 12:50 IST

राष्ट्रवादीच्यावतीने २ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन होणार आहे.

सांगली- सांगलीतील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचा वाद चिघळला आहे. याचदरम्यान पुन्हा राष्ट्रवादी विरुद्ध भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर असा संघर्ष निर्माण झाला आहे.

राष्ट्रवादीच्यावतीने २ एप्रिल रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्या हस्ते या स्मारकाचं उद्घाटन होणार आहे. मात्र शरद पवार यांच्या हस्ते होणाऱ्या या उद्घाटन सोहळ्याला गोपीचंद पडळकर यांनी विरोध केला आहे. यानंतर अनुचि प्रकार टाळण्यासाठी प्रशासनाने स्मारक परिसरात संचारबंदी देखील लागू केली आहे. 

अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन सामान्य मेंढपाळांच्या हस्ते आम्ही करणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी सांगितले. मला जेलमध्ये टाकले तरी चालेल, पण कोणत्याही परिस्थितीत आम्ही रविवार दिनांक २७ मार्च अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे उद्घाटन करणार असल्याचे गोपीचंद पडळकर यांनी जाहीर केले आहे. 

दरम्यान, सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेने विजयनगर इथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं स्मारक उभारलं आहे. अडीच कोटी रुपये खर्च करुन हे स्मारक बांधण्यात आलं आहे. कोरोनाच्या संकटामुळे गेल्या दोन वर्षांपासून स्मारकाचं लोकार्पण रखडलं होतं. अखेर यंदा महापालिकेने शरद पवार यांच्या हस्ते २ एप्रिल रोजी स्मारकाचं लोकार्पण करण्याचं निश्चित केलं आहे. मात्र आमदार गोपीचंद पडळकर यांनी २७ मार्च रोजी स्मारकाचं लोकार्पण करण्याचा इशारा दिला. 

टॅग्स :Gopichand Padalkarगोपीचंद पडळकरSharad Pawarशरद पवारNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपाSangliसांगली