शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

भाजपमधील खबऱ्याला समज

By admin | Updated: December 30, 2014 23:26 IST

नेत्यांकडे तक्रार : गोपनीय माहिती फोडल्याने नाराजी

सांगली : पुणे येथे झालेल्या बैठकीसह पक्षातील गोपनीय बैठकांची व हालचालींची माहिती बाहेर सांगणाऱ्या कुपवाडमधील एका भाजप नेत्याला जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी खडसावले. या नेत्याबाबत पक्षातील वरिष्ठ नेत्यांकडेही तक्रार करण्यात आली असून, या प्रकाराबाबत समज देण्यात आली आहे. पक्षातील एका महत्त्वाच्या पदाधिकाऱ्याने सांगितले की, भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. त्यामुळे अशा गोष्टी या पक्षात चालणार नाहीत. यापूर्वीही पक्षांतर्गत गोष्टींबाबत संबंधित नेत्याने बाहेर माहिती पुरविली होती. त्यावेळीही त्यांना समज देण्यात आली होती. त्यांनी हे प्रकार थांबविले नाहीत, तर त्यांच्यावर पक्षांतर्गत कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे. पुण्यातील भाजप नेत्यांच्या बैठकीमध्ये झालेल्या चर्चेची माहिती संबंधित नेत्याने बाहेर अनेकांना पुरविली. त्यामुळे पक्षाचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते नाराज झाले होते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या सांगली दौऱ्यावेळी हा विषय उपस्थित झाला. माधवनगर रस्त्यावरील विश्रामगृहात काही पदाधिकाऱ्यांनी त्यांच्याविषयी तक्रार केली. पालकमंत्र्यांनीही त्या नेत्यास समज देऊन यापुढे कारवाई केली जाईल, असा इशाराही दिल्याचे समजते. या वृत्तास एका पदाधिकाऱ्याने दुजोरा दिला आहे. (प्रतिनिधी)