शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

सांगली: मिरजेत राष्ट्रवादीला शह देण्याची भाजपची रणनीती, आगामी निवडणुकीसाठी तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2022 13:12 IST

भाजप नेत्यांनी मिरज पश्चिम भागातील गावोगावच्या वजनदार नेत्यांना भाजपमध्ये प्रवेशासाठी जाळे टाकले

कसबे डिग्रज : आगामी काळात जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायतीच्या निवडणुका होणार आहेत. विविध प्रकारची सत्ता केंद्रे ताब्यात असणाऱ्या भाजपला इस्लामपूर मतदारसंघात ताकद वाढवायची आहे. यासाठी भाजप नेत्यांनी मिरज पश्चिम भागातील गावोगावच्या वजनदार नेत्यांना भाजपमध्ये प्रवेशासाठी जाळे टाकले आहे. यातून विरोधकांना प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसला धक्का देण्यासाठी प्रयत्न केला जात आहे. आतापर्यंत तीन वेळा वरिष्ठ नेत्यांच्या बैठका झाल्या आहेत.मिरज पश्चिम भागातील आठ गावे इस्लामपूर मतदारसंघाला जोडली गेली आहेत. काम करणाऱ्या नेत्यांच्या पाठिशी हा भाग ठामपणे उभा राहतो. म्हणूनच सांगली मतदारसंघात विविध नेते आणि पक्ष यांना संधी मिळाली. तीच परिस्थिती सध्याही कायम आहे.गेल्या तीन विधानसभेला आमदार जयंत पाटील यांना या भागाने साथ दिली. कार्यकर्त्यांच्या गटागटाची जयंत पाटील यांनाही माहिती आहे आणि गट - तट कितीही असूदेत म्हणत त्यांनीही त्यास खतपाणी दिले. यातूनच काहीजण नाराज आहेत. हीच नाराजी राष्ट्रवादीच्या विविध कार्यक्रमात उफाळून येते आहे.अशाच नाराज नेत्यांना हेरण्याचे काम भाजपने चालविले आहे. कसबे डिग्रज, कवठेपिरान, तुंग, दुधगाव या गावातील प्रमुखासाठी राहुल महाडिक आणि सांगलीतील शेखर इमानदार यांच्याकडे जबाबदारी सोपविण्यात आली आहे.प्रमुख लोकांची बैठक मंत्री चंद्रकांत पाटील, माजी आमदार दिनकर पाटील यांच्या सोबत झाली आहे. त्यामुळे जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि सरपंच आणि ग्रामपंचायतीच्या आगामी निवडणुका जिंकण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य आणि कार्यकर्त्यांना पाठबळ देण्याची तयारी आहे. निर्णय गावोगावीच्या नेत्यांनी घ्यावा, असे आवाहन भाजप पदाधिकाऱ्यांनी केले आहे. त्यामुळे आगामी काळात कोण कोण भाजपमध्ये प्रवेश करतात आणि भाजप किती जणांना धक्के देतोय, हे दिसून येईल.

टॅग्स :Sangliसांगलीmiraj-acमिरजPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसBJPभाजपा