शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

जगतापांमुळे जत तालुक्यात भाजप राष्ट्रवादीच्या दावणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:27 IST

जत : राज्यातील महाविकास आघाडीविरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी परखड विरोधी भूमिका ...

जत : राज्यातील महाविकास आघाडीविरोधात भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी परखड विरोधी भूमिका घेऊन दोन मंत्र्यांना राजीनामा देण्यास भाग पाडले आहे. परंतु जत तालुक्यात माजी आमदार विलासराव जगताप हे राष्ट्रवादीबरोबर युती करून पक्ष राष्ट्रवादीच्या दावणीला बांधण्याचे काम करीत आहेत. या संदर्भात पक्षनेतृत्वाकडे आपण तक्रार करणार आहोत, अशी माहिती भाजपचे नगरसेवक विजय ताड यांनी पत्रकार बैठकीत दिली.

ताड म्हणाले, स्वीकृत नगरसेवक उमेश सावंत यांचा वाळूतस्करीचा व वाळूचोरीचा व्यवसाय आहे. या संदर्भात जत व उमदी पोलिसांत गुन्हे दाखल आहेत. त्यांना पाठीशी घालण्याचे काम माजी आमदार विलासराव जगताप करीत आहेत. त्यामुळे तालुक्यात पक्ष बदनाम होत आहे. उमेश सावंत यांना स्वीकृत नगरसेवक पदावरून व मला विरोधी पक्ष नेतेपदावरून बदलण्याबाबत माजी आमदार विलासराव जगताप यांच्यासमोर निर्णय झाला होता. मला बदलण्यात आले; पण उमेश सावंत यांना का बदलण्यात आले नाही? यापाठीमागे नेमके काय कारस्थान आहे, ते समजून येत नाही.

उमेश सावंत यांच्या फार्महाऊसवर १५ दिवसांपूर्वी भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसचे मोजके नगरसेवक आणि कार्यकर्त्यांची बैठक घेऊन जत तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर मिळून काम करावे, अशी सूचना माजी आमदार विलासराव जगताप यांनी सर्वांना केली होती. राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी सभापती सुरेश शिंदे या बैठकीला उपस्थित होते. या संदर्भात पक्षनेतृत्वाकडे आपण तक्रार करणार आहाेत, असेही विजय ताड म्हणाले.

विरोधी पक्षनेता म्हणून जत नगरपालिकेतील स्मशानभूमीचा प्रश्न, तिरडी मोर्चा, पाणीप्रश्न, नगरपालिका प्रशासनाला विकासकामांच्या संदर्भात जाब विचारून टाळे ठोकण्यात आले. मी प्रखर विरोधी भूमिका मांडली आहे. प्रशासनाला वेळोवेळी धारेवर धरून मासिक बैठकीत विकासकामे मंजूर करून घेतली. तरीही मला त्या पदावरून बदलण्यात आले. विरोधी पक्षनेतेपद बदलण्यासाठी केवळ दोनच नगरसेवक उपस्थित असताना कागदाेपत्री बैठक दाखवून इतर नगरसेवकांच्या घरी जाऊन त्यांच्या सह्या घेण्यात आल्याचा आराेपही त्यांनी यावेळी केला. नगरसेवक प्रकाश माने, श्रीदेवी सगरे व स्वीकृत नगरसेवक उमेश सावंत यांच्याविरोधात न्यायालयात अब्रुनुकसानीचा दावा दाखल करणार आहे, असेही विजय ताड म्हणाले.