शहरं
Join us  
Trending Stories
1
एसटी बँकेच्या बैठकीत संचालकांमध्ये फ्रीस्टाईल; बाटल्यांची फेकाफेक, शिवीगाळ, आरोप-प्रत्यारोप
2
महिलेचे नाव वेगवेगळ्या एपिक नंबरसह, दुपारी ३ वाजता वेबसाईटवर होती, सहा वाजता गायब...; निवडणूक आयोग अनभिज्ञ...
3
माजी पालिका आयुक्तांची अटक बेकायदा; कोर्टाचा ईडीला दणका
4
Rain Alert: अवकाळीची शक्यता, १३ जिल्ह्यांना यलो अलर्ट; कोणत्या दिवशी, कुठे कोसळणार...
5
आता शहरी नक्षलवादाविरुद्ध लढा : मुख्यमंत्री फडणवीस
6
सोनं वाढतंय, आणखी वाढीच्या अपेक्षेने गुंतवणूकदार टाकू लागले सोन्यात पैसा
7
‘अरे हीरो, क्या हाल है भाई?’, रोहित-गिल यांनी मारली मिठी
8
मुंबईकरांचा संकटमोचक आला धावून...; रणजी करंडक : सिद्धेशच्या शतकाने मुंबईचे पुनरागमन
9
सुपरस्टार ख्रिस्तियानो रोनाल्डोची विश्वविक्रमी ‘किक’; विश्वचषक पात्रता फेरीत केले सर्वाधिक गोल
10
यशस्वी जैस्वालचे पुन्हा अव्वल पाचमध्ये आगमन
11
वर्चस्व गाजवूनही पाकचे एका गुणावर समाधान; पावसाच्या व्यत्ययामुळे इंग्लंडचा पराभव टळला
12
‘राष्ट्रकुल’चे यजमानपद अहमदाबादला; कार्यकारी मंडळाची शिफारस
13
'खट्याळ सासू नाठाळ सून' सिनेमात निवेदिता सराफ यांना होती पहिली पसंती, पण नंतर वर्षा उसगांवकर यांची लागली वर्णी
14
Ghost Town Visitor: हा फोटो काढायला दहा वर्षे लागली अन् ठरला 'फोटोग्राफर ऑफ द ईयर'; सगळी स्टोरी काय?
15
आई-वडील, दोन मुली, एक मुलगा...; जैसलमेर बस दुर्घटनेत अख्खं कुटुंब जळून खाक!
16
"...म्हणूनच आज शरद पवार त्यांच्यासोबत गेले नाहीत"; विरोधकांच्या आरोपांना CM फडणवीसांचे जोरदार उत्तर
17
1 रुपयात दररोज 2 GB डेटा, अनलिमिटेड कॉलिंग अन्..; BSNL ने आणली नवीन दिवाळी ऑफर
18
बाळासाहेब थोरातांचा १ लाख  नाही तर एवढ्या मतांनी पराभव, राज ठाकरेंचा तो दावा ठरला चुकीचा
19
Ranji Trophy : पुणेकर झाला महाराष्ट्र संघाचा 'कणा'; ऋतुराज गायकवाडचं शतक थोडक्यात हुकलं, पण...
20
"आम्ही त्यांचं नाव जगाच्या नकाशावरून पुसून टाकू" इस्रायलची हमासला धमकी!

भाजपकडून सांगलीत राष्ट्रवादी पक्षाच्या निषेधाच्या घोषणा, निदर्शने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 16:23 IST

Bjp Sangli Ncp- आदिवासी प्रवर्गातील नगरसेविका स्वाती पारधी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अन्यायाला, जातीयवादी राजकारणाला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा दिला असून एका आदिवासी प्रवर्गातील नगरसेविकेवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ भाजपच्या भटके-विमुक्त जाती मोर्चाच्या वतीने सांगली बस स्थानकासमोरील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने करण्यात आली.

ठळक मुद्देभाजपकडून सांगलीत राष्ट्रवादी पक्षाच्या निषेधाच्या घोषणा, निदर्शने आदिवासी प्रवर्गातील नगरसेविकेवर होणाऱ्या अन्यायाचा निषेध

सांगली -आदिवासी प्रवर्गातील नगरसेविका स्वाती पारधी यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या अन्यायाला, जातीयवादी राजकारणाला कंटाळून आपल्या पदाचा राजीनामा दिला असून एका आदिवासी प्रवर्गातील नगरसेविकेवर होणाऱ्या अन्यायाच्या निषेधार्थ भाजपच्या भटके-विमुक्त जाती मोर्चाच्या वतीने सांगली बस स्थानकासमोरील भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निषेधाच्या घोषणा देत निदर्शने करण्यात आली.

फुले, शाहु, आंबेडकर यांचे नाव घेऊन राजकारण करणा-या सांगली राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात आदिवासी समाज व मागासवर्गीय समाजातील कार्यकर्ते व नगरसेवकांवर सातत्याने अन्याय होत आहे. त्यांना जातीयवादी शिवीगाळ, दमदाटी केली जाते.त्यांच्या प्रभागात काही कामावरून वाद आहे,सततच्या वादाला कंटाळून नगरसेवक योगेंद्र थोरात व नगरसेविका स्वाती पारधी यांनी महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.

याबाबत पक्षाच्या नेत्यांकडे तक्रार करूनही काहीच उपयोग होत नाही, राष्ट्रवादी शहर जिल्हाध्यक्ष या सर्व गोष्टीकडे दुर्लक्ष करतात व नगरसेवक थोरात यांनीही सातत्याने अन्याय होत असल्याचे सांगितले आहे. भाजपवर जातीयवादी असल्याचा आरोप करणारा राष्ट्रवादी हाच खरा जातीयवादी आहे,त्यामुळे आम्ही त्यांचा जाहीर निषेध करतो असे संघटन सरचिटणीस दीपक माने यांनी सांगितले,

यावेळी भटके विमुक्त जाती अध्यक्ष राजू जाधव, अनुसूचित युवा मोर्चा अध्यक्ष अमित भोसले,ओबीसी युवा अध्यक्ष राहुल माने, प्रदेश सदस्य ज्योती कांबळे, भटके विमुक्त जाती महिला अध्यक्ष गीता पवार, सोशल मिडिया अध्यक्ष निलेश निकम,संगीता जाधव, संदीप जाधव, सोहम जोशी, अण्णा वडर, राजू मद्रासी , राहुल शिंदे, सुभाष कांबळे यांच्यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते सहभागी झाले होते.

 

टॅग्स :BJPभाजपाNCPराष्ट्रवादी काँग्रेसSangliसांगली