शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

सांगलीत राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षास मोठा धक्का, वैभव पाटील भाजपात प्रवेश करणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 13:21 IST

खानापूरच्या राजकारणाला नवी कलाटणी मिळणार

विटा : डबल महाराष्ट्र केसरी पै. चंद्रहार पाटील यांनी उद्धवसेनेला धक्का देत शिंदेसेनेत प्रवेश केल्यानंतर आता खानापूर मतदारसंघात शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा दणका बसत असून माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील व त्यांचे सुपुत्र विट्याचे माजी नगराध्यक्ष ॲड. वैभव पाटील यांच्यासह कार्यकर्त्यांचा आज मंगळवारी भारतीय जनता पार्टीत प्रवेश होत आहे. मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश होणार आहे.विट्याचे माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी विधानसभा निवडणुकीपूर्वी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून जिल्हाध्यक्षपद घेतले होते. परंतु, विधानसभा निवडणुकीत खानापुरात महायुतीकडून आमदार सुहास बाबर यांना उमेदवारी मिळाल्यानंतर त्यांनी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला रामराम ठोकून शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करून त्या पक्षाची उमेदवारी घेत विधानसभेची निवडणूक लढविली.

या निवडणुकीतील पराभवानंतर माजी आमदार सदाशिवराव पाटील, वैभव पाटील समर्थक कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीत सहभागी होण्याची इच्छा नेत्यांकडे व्यक्त केली. गेल्या दोन दिवसांपूर्वी विट्यात झालेल्या प्रमुख कार्यकर्त्यांच्या मेळाव्यातही कार्यकर्त्यांनी नेत्यांवर दबाव आणून भाजप प्रवेशाचा आग्रह केला होता.विटा नगरपालिकेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आल्याने सत्ताधारी पक्षात सहभागी होणे गरजेचे असल्याचे मत नेत्यांनीही व्यक्त केले. या पार्श्वभूमीवर माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील, वैभव पाटील यांनी भाजपात जाण्याचा अंतिम निर्णय घेतला. त्यामुळे आज मंगळवारी सकाळी ११ वाजता मुंबईतील भारतीय जनता पार्टीच्या पक्ष कार्यालयात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, सांगलीचे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह अनेक मंत्र्यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याहस्ते ॲड. सदाशिवराव पाटील, वैभव पाटील यांच्यासह हजारो कार्यकर्त्यांचा भाजप प्रवेश होत आहे.खानापूरच्याराजकारणाला नवी कलाटणी मिळणारखानापूरचे माजी आमदार ॲड. सदाशिवराव पाटील व ॲड. वैभव पाटील यांनी शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी देत सत्ताधारी भारतीय जनता पक्षात प्रवेश केल्याने विट्यासह खानापूर मतदारसंघातील राजकारणाला पुन्हा एकदा कलाटणी मिळणार आहे.मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत लवकरच मेळावामाजी आमदार सदाशिवराव पाटील व वैभव पाटील यांच्या भाजप प्रवेशानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत विट्यात पक्षाचा मोठा मेळावा घेण्यात येणार असून या मेळाव्यात वैभव पाटील समर्थक कार्यकर्ते शक्तिप्रदर्शन करणार आहेत. या मेळाव्याची तारीख पक्षप्रवेशानंतर निश्चित करण्यात येणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkhanapur-acखानापूरPoliticsराजकारणNCPराष्ट्रवादी काँग्रेसSharad Pawarशरद पवारBJPभाजपा