कवठेमहांकाळला क्रीडा संकुलाचे भूमिपूजन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:32 IST2021-08-18T04:32:47+5:302021-08-18T04:32:47+5:30
रविवारी जत-कवठेमहांकाळ रस्त्यालगत असणाऱ्या बेघर वसाहतीशेजारील रिकाम्या जागेत हा कार्यक्रम पार पडला. यावेळी खासदार पाटील म्हणाले की, धावपळीच्या युगात ...

कवठेमहांकाळला क्रीडा संकुलाचे भूमिपूजन
रविवारी जत-कवठेमहांकाळ रस्त्यालगत असणाऱ्या बेघर वसाहतीशेजारील रिकाम्या जागेत हा कार्यक्रम पार पडला.
यावेळी खासदार पाटील म्हणाले की, धावपळीच्या युगात आरोग्य चांगले राहण्यासाठी व्यायाम आवश्यक आहे. त्यासाठी शहरात क्रीडा संकुल उभारले जात आहे.
आमदार पाटील म्हणाल्या की, कवठेमहांकाळ शहराच्या विकासात तालुका क्रीडा संकुल भर टाकेल. त्यासाठी निधी कमी पडू देणार नाही.
यावेळी राष्ट्रवादीच्या नेत्या अनिता सगरे, जिल्हा बँकेचे संचालक चंद्रकांत हाक्के, सभापती विकास हाक्के, तहसीलदार बी. जे. गोरे, जिल्हा क्रीडाधिकारी माणिक वाघमारे, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष टी. व्ही. पाटील, शहराध्यक्ष महेश पाटील, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संजय हजारे, अविराजे शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख मारुती पवार उपस्थित होते.