शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: टेंभू योजनेच्या ६ व्या टप्प्याचे २ ऑक्टोंबरला भूमिपूजन, सुहास बाबर यांनी दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2024 15:54 IST

मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती

दिलीप मोहितेविटा : खानापूर, आटपाडीसह विसापूर सर्कलमधील वंचित शेतीला पाणी देणासाठी विशेष मंजुरी मिळालेल्या टेंभू योजनेच्या ६ वा अ व ६ वा ब या दोन्ही टप्प्याचे भूमिपूजन दि. २ ऑक्टोंबर रोजी विटा येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते होणार असून या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उपस्थित राहणार असल्याची माहिती जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुहास बाबर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.सुहास बाबर म्हणाले, दिवंगत आ. अनिल बाबर हे टेंभू योजनेच्या पूर्ततेसाठी आपले आयुष्य जगले. खानापूर मतदारसंघातील एकही गाव टेंभूपासून वंचित राहू नये, यासाठी त्यांनी योगदान दिले. त्यांच्या आयुष्यातील शेवटची इच्छा ही टेंभू योजनेचा ६ वा टप्पा पूर्ण करून वंचित गावांना पाणी देण्याची होती. या टप्प्याला मंजुरी देऊन ती इच्छा मुख्यमंत्री शिंदे यांच्यासह मंत्रीमंडळाने पूर्ण केली आहे.या ६ व्या टप्प्याचे भूमिपूजन दि. २ आॅक्टोंबर रोजी सकाळी ११ वाजता विटा येथील रेवानगर (सुळेवाडी) येथे मुख्यमंत्री शिंदे यांच्याहस्ते होणार आहे. यावेळी दोन्ही उपमुख्यमंत्री, उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई, उद्योगमंत्री उदय सामंत उपस्थित राहणार आहेत. यावेळी विट्यात शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असल्याचे सुहास बाबर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. यावेळी तानाजीराव पाटील, जिल्हा बॅँकेचे संचालक अमोल बाबर, कृष्णत गायकवाड, उत्तम चोथे, अनिल म. बाबर यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.‘टेंभू’च अनिलभाऊंचे खरे स्मारक..दिवंगत आ. अनिल बाबर हे शेतकऱ्यांना टेंभूचे पाणी मिळावे यासाठी जगले. आता ६ व्या टप्प्याच्या माध्यमातून त्यांचे शेवटचे काम पूर्ण होत आहे. या योजनेची पूर्तता हेच आ. अनिलभाऊंचे खरे स्मारक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी विटा येथील मेळाव्यास उपस्थित रहावे, असे आवाहन सुहास बाबर यांनी केले.

टॅग्स :SangliसांगलीWaterपाणीFarmerशेतकरीChief Ministerमुख्यमंत्री