जत तालुका शिक्षक संघ अध्यक्षपदी भारत क्षीरसागर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2021 04:11 AM2021-01-24T04:11:49+5:302021-01-24T04:11:49+5:30

संख : जत तालुका शिक्षक संघ शि. द. पाटील गटाच्या तालुकाध्यक्षपदी भारत क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. याबद्दल जाडरबोबलाद ...

Bharat Kshirsagar as the President of Jat Taluka Teachers Association | जत तालुका शिक्षक संघ अध्यक्षपदी भारत क्षीरसागर

जत तालुका शिक्षक संघ अध्यक्षपदी भारत क्षीरसागर

Next

संख : जत तालुका शिक्षक संघ शि. द. पाटील गटाच्या तालुकाध्यक्षपदी भारत क्षीरसागर यांची निवड करण्यात आली. याबद्दल जाडरबोबलाद केंद्रातील सोन्याळ येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत मुख्याध्यापक धानाप्पा शिंगे यांच्या हस्ते क्षीरसागर यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी भीमराय बिरादार होते.

भारत क्षीरसागर म्हणाले, शिक्षक संघात मला मानाचे स्थान मिळाले आहे. त्यामुळे तालुक्यातील शिक्षकांची कामे प्रामाणिकपणे करण्याचा निर्धार केला आहे. यावेळी श्रीकांत माळी, सिद्धणा बिराजदार, गंगया मठपती, बसवराज बिराजदार, भीमराव बिरादार, रफिक नदाफ, अशोक मुचंडी, अनिल चौगले, सुभाष कोळी, सिद्धू लमान, भालचंद्र गडदे उपस्थित होते.

फोटो-२३संख१

फोटो ओळ : जत तालुका शिक्षक संघ शि. द. पाटील गटाच्या तालुकाध्यक्षपदी भारत क्षीरसागर यांची निवड झाल्याबद्दल मुख्याध्यापक धानाप्पा शिंगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संचालक श्रीकांत माळी, सिद्धणा बिराजदार, गंगया मठपती, बसवराज बिराजदार उपस्थित होते.

Web Title: Bharat Kshirsagar as the President of Jat Taluka Teachers Association

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.