शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
2
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
3
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
4
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
5
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
6
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
7
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
8
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
9
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
10
नाकाबंदी : इराणची आर्थिक कोंडी करणारी व्यूहरचना
11
अमेरिकेकडून होर्मुझची नाकाबंदी सुरू; समुद्रात गस्त वाढवली, युद्ध भडकणार
12
"हे खूप क्रूर असेल, जवळ आले की नष्ट करू", नाकेबंदी सुरू होताच ड्रोनाल्ड ट्रम्प यांची इराणला नवी धमकी
13
SRH चा 'प्रफुल्लित' विजय! सनरायझर्सच्या दोन रायझिंग स्टार्संसमोर RR च्या 'धुरंधरां'नी टेकले गुडघे
14
"मी साडी नेसलेली होती, त्यात अश्लीलता कुठे होती?", ती तरुणी ढसाढसा रडली, ट्रोलिंगनंतर 'धक-धक' गर्ल काय म्हणाली?
15
डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीमुळे भारताच्या अडचणी वाढणार, होर्मुझ बंद झाली तर आता काय होईल?
16
Praful Hinge नं सांगून पहिल्याच बॉलवर काढली Vaibhav Suryavanshi ची विकेट; मॅचनंतर म्हणाला...
17
बालमैत्रिणीसाठी आशाताई दोनदा आल्या गडहिंग्लजला! महिला बँकेचे उद्घाटन, महाविद्यालयाच्या मदतीसाठी विनामूल्य कार्यक्रम 
18
शॉम्पूच्या बॉटलमध्ये ४.२६ कोटींचे कोकेन, नागपुरात राजधानी एक्सप्रेसमध्ये सिनेस्टाईल कारवाई
19
Praful Hinge : विदर्भकराचा पदार्पणात महारेकॉर्ड! पहिल्या षटकात वैभव सूर्यवंशीसह तिघांची विकेट घेत रचला इतिहास
20
युद्ध पुन्हा पेटणार! ट्रम्प यांचा मोठा आदेश आणि नेतन्याहूंचा सीजफायर संपवण्याचा इशारा, म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

२००१ पूर्वीचीच निकाली निघणार

By admin | Updated: June 15, 2015 00:19 IST

गुंठेवारीचा प्रश्न प्रलंबितच : राज्य शासनाच्या आदेशाची प्रतीक्षा

सांगली : गुंठेवारीचा प्रश्न अद्याप प्रलंबित राहिला असून, केवळ २००१ पूर्वीचीच कायदेशीर असणारी प्रकरणे निकाली काढण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. २००१ पूर्वीची जिल्ह्यातील सुमारे पाच हजारहून अधिक प्रकरणे आता नियमित होणार असल्यामुळे रहिवाशांना दिलासा मिळाला आहे. वाढत्या शहरीकरणामुळे गेल्या वीस वर्षात गुंठेवारीचा प्रश्न फोफावला आहे. शेतजमिनीची बेकायदा फोड करुन नागरिकांनी आपल्या सोयीनुसार गुंठेवारीमध्ये घरे बांधून ते निवास करीत आहेत. हा गंभीर प्रश्न उद्भवल्यानंतर राज्य शासनाने एका अध्यादेशाद्वारे जानेवारी २००१ नंतरच्या गुंठेवारी खरेदी-विक्रीवर बंदी घातली. मुद्रांक घोटाळ्यामुळे २००१ पूर्वीचेही गुंठेवारीचे अनेक प्रस्ताव रखडले. यामुळे महापालिका क्षेत्रामध्ये २००१ नंतरचे पंधरा हजारहून अधिक, तर २००१ पूर्वीचे सुमारे पाच हजारहून अधिक गुंठेवारी नियमितीकरणाचे प्रस्ताव रखडले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले होते. त्यानुसार २००१ पूर्वीचे गुंठेवारीचे करारपत्र नोंदणी करुन घेण्यासाठी प्रशासनाकडून पत्र दिले जाणार आहे. या नोंदणीनंतर अकृषक कर भरुन एन ए (अकृषक) करण्याची प्रक्रिया तात्काळ केली जाणार आहे. त्यामुळे २००१ पूर्वीचे गुंठेवारीचे प्रस्ताव नियमितीकरण होण्यास मदत होणार आहे. २००१ नंतरची गुंठेवारी प्रक्रिया रखडल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. अनेकांनी परवानगी न घेताच घराचे बांधकाम केले आहे. त्यामुळे याबाबत शासन काय निर्णय घेणार, याकडे गुंठेवारीतील नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे. (प्रतिनिधी)