शहरं
Join us  
Trending Stories
1
एकनाथ शिंदेंनी हेरले ठाकरेंचे मोहरे, मुंबईतील मराठीबहुल पट्ट्यात 'बंडखोरां'ना तिकीट; गेम फिरणार?
2
"९९ टक्के युती झाली होती, पण अर्जून खोतकरांचे म्हणणं होतं की..."; युती तुटल्याची लोणीकरांकडून घोषणा, भाजपा स्वबळावर लढणार
3
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेपूर्वी टीम इंडियाला मोठा धक्का, मॅचविनर खेळाडू जाणार संघाबाहेर, अचानक घटलं सहा किलो वजन  
4
Mumbai Accident: कोस्टल रोडवर तीन वाहनांमध्ये जोरदार धडक! दोन जण जखमी, अपघात नेमका कसा घडला?
5
Shravan Singh : Video - मोठा होऊन काय होणार?, जवानांची सेवा करणाऱ्या चिमुकल्याने जिंकलं मोदींचं मन
6
बांगलादेशमध्ये आणखी एका हिंदूची हत्या,  बजेंद्र बिस्वास याचा गोळ्या झाडून घेतला जीव
7
मुंबई: शिवडीमध्ये भीषण आग! एकापाठोपाठ एक ४ सिलेंडरचा स्फोट झाल्याने खळबळ, जिवीतहानी नाही
8
"लोकांनीच त्यांना स्वीकारलं त्यामुळे..."; एकाच घरात तिघांना उमेदवारी मिळाल्यानंतर राहुल नार्वेकरांचे स्पष्टीकरण
9
वर्षाअखेरीस बाजारात 'सुस्ती'! गुंतवणूकदारांचे २२,००० कोटी पाण्यात; टाटा स्टीलची मात्र बाजी
10
Viral Video: सूर्या दादानं शेरवानी घातली तर, वहिनींनी नेसली रेशमी साडी; दोघेही बालाजीच्या चरणी नतमस्तक!
11
'रोहित आणि विराटला निवृत्त होण्यास भाग पाडले...', माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
12
MS Dhoni च्या तालमीत तयार झालेल्या CSK क्रिकेटरने दिली गुड न्यूज, लवकरच होणार 'बाबा'
13
BMC Election 2026: महायुतीत मोठी फूट! अजित पवारांच्या राष्ट्रवादीनंतर बड्या पक्षाची 'एकला चलो रे'ची हाक
14
"मुलगी मित्रांसोबत गेली...", रक्ताच्या थारोळ्यात सापडली नववीची विद्यार्थिनी; ICU मध्ये मृत्यूशी झुंज
15
जागा शिंदेसेनेला सुटली, धनुष्यबाणावर लढण्याची ऑफरही आली, पण..., भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्तीने घेतला मोठा निर्णय  
16
डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? सावधान! सेबीने दिला इशारा; तुमचे पैसे अडकण्याची भीती
17
Mamata Banerjee : "I Don't Care", अमित शाह यांच्या टीकेला ममता बॅनर्जींचं प्रत्युत्तर; केंद्र सरकारवर गंभीर आरोप
18
सोलापुरात अभूतपूर्व गोंधळ! भाजपाचे एबी फॉर्म वेळेत न पोहचल्याने संताप, विरोधकांचा दारातच ठिय्या
19
Anjel Chakma : खळबळजनक! बर्थडे पार्टी, शिवीगाळ अन्... एंजेल चकमा हत्या प्रकरणात धक्कादायक खुलासा
20
सौदी अरेबियानं UAE च्या जहाजांना का केले उद्ध्वस्त?; २४ तासांचा अल्टिमेटम, २ मित्र बनले शत्रू
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election 2026: भाजपने अंडरएस्टिमेट केल्याने शिंदेसेना सर्व जागा लढणार - शंभूराज देसाई 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 30, 2025 15:44 IST

आता आमची ताकद दाखवूनच देऊ

सांगली : महापालिका निवडणुकीत भाजपने आमचा मान- सन्मान ठेवला नाही. राज्यात सर्व ठिकाणी भाजप व शिंदेसेनेची युती असताना सांगलीत मात्र ‘अंडरइस्टिमेट’ केले आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत सर्व प्रभागात आमचे उमेदवार उभे करणार आहे. निवडणूक ताकदीने लढून आमची ताकद नक्कीच दाखवून देऊ, असा इशारा पर्यटनमंत्री तथा संपर्कप्रमुख शंभूराज देसाई यांनी दिला.महापालिका निवडणुकीत महायुतीतून राष्ट्रवादी (अजित पवार) गट बाहेर पडल्यानंतर शिंदेसेनेबरोबरची जागा वाटपाची चर्चा फिस्कटली आहे. महापालिकेत भाजने शिंदेसेनेला बरोबर घेण्याचा शब्द दिला होता. मात्र ऐनवेळी युती होणार नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे शिंदेसेनेचे जिल्हाप्रमुख बजरंग पाटील यांनी सर्व प्रभागातील ७८ जागांवर उमेदवार उभे करण्याची घोषणा केली होती.

वाचा : सांगलीत भाजपमध्ये नाराजीनाट्य, बंडखोरांनी थोपटले दंड; दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणारया पार्श्वभूमीवर सोमवारी शिंदेसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी प्रमुख पदाधिकाऱ्यांनी एका हॉटेलवर बैठक घेतली. या बैठकीत निवडणुकीबाबत जोरदार चर्चा झाली. आमदार सुहास बाबर, जिल्हाप्रमुख बजरंग पाटील, महानगर क्षेत्रप्रमुख मोहन वनखंडे, सुनीता मोरे, शहरप्रमुख सचिन कांबळे आदी उपस्थित होते. या बैठकीत मंत्री शंभूराज देसाई यांनी महापालिका निवडणूक स्वबळावर लढविण्याची घोषणा केली.देसाई म्हणाले, महापालिकेच्या निवडणूक भाजपबरोबर लढण्यासाठी पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याबरोबर चर्चा झाली. आम्हाला जागा वाटपात योग्य सन्मान मिळावा अशी आमची मागणी होती. जागा वाटपात तडजोड करण्याची तयारी आम्ही दर्शवली होती. मात्र भाजपने आमचा मान-सन्मान ठेवला नाही. त्यामुळे अखेरच्या क्षणी आमची युती तुटली.

मंगळवारी अर्ज भरण्याचा अखेरचा दिवस आहे. आम्ही कार्यकर्त्याला लढायला शिकवले आहे. त्यामुळे आता थांबणार नाही. स्वबळावर सर्व जागा पक्षाच्या चिन्हावर पूर्ण ताकदीनिशी लढणार आहे. प्रचारात पूर्ण वेळ देणार आहे. भाजपने आम्हाला बेदखल केल्यामुळे त्यांना ताकद दाखविण्यासाठी पदाधिकाऱ्यांनी कामाला लागावे. यावेळी मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत भाजप व महाविकास आघाडीतील काही पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli: Shinde Sena to contest all seats after BJP underestimates them.

Web Summary : Shinde Sena will contest all Sangli Municipal Corporation seats independently. BJP underestimated them, disrespecting their alliance. Shambhuraj Desai announced this after seat-sharing talks failed. The party aims to demonstrate its strength in the upcoming election.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६MahayutiमहायुतीBJPभाजपाShambhuraj Desaiशंभूराज देसाईShiv SenaशिवसेनाEknath Shindeएकनाथ शिंदे