शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईकरांसाठी महायुतीचा 'वचननामा' जाहीर; ५ वर्षांसाठी पाणीपट्टी स्थगीत, महिलांसाठी BESTचे अर्धे तिकीट अन् बरंच काही!
2
“काँग्रेसने कितीही प्रयत्न केले तरी लाडकी बहीण योजनेचे पैसे थांबवू शकत नाहीत”: CM फडणवीस
3
“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
4
‘गझनीपासून औरंगजेबापर्यंत इतिहासात गडप झाले, पण सोमनाथ…’, मोदींचं मोठं विधान
5
BMC Election 2026: ...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
6
"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
7
११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
8
Exclusive: महेश मांजरेकरांकडून अमित ठाकरेंना होती 'पुन्हा शिवाजीराजे भोसले' सिनेमाची ऑफर, स्वत:च केला खुलासा
9
इराणमध्ये सरकारविरोधी आंदोलन तीव्र; आंदोलकांना थेट मृत्युदंडाचा इशारा
10
महिलांना आत्मनिर्भर करणारी योजना! ४,४५० रुपयांच्या योजनेवर मिळवा १६ लाखांचा निधी
11
IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
12
“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
13
चक्क साडी नेसून मैदानात उतरल्या महिला; फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ!
14
SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
15
पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
16
IND vs NZ 1st ODI : नव्या वर्षात टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत! डावखुऱ्या हाताने नाणे उंचावत गिल ठरला 'उजवा' अन्...
17
निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना मोठा धक्का! दगडू सकपाळ यांचा शिंदेंच्या शिवसेनेत जाहीर प्रवेश
18
श्रेयस अय्यर विमानतळावर असताना विचित्र प्रकार! कुत्र्याने जबडा उघडला, तितक्यात... (VIDEO)
19
US Air Strike In Syria : आता सीरियात अमेरिकेचा मोठा हल्ला, 35 ठिकानांवर बॉम्बिंग; 90 हून अधिक 'प्रिसीजन म्यूनिशन'चा वापर
20
Bigg Boss Marathi 6: 'बिग बॉस मराठी'चा नवा सीझन कुठे पाहाल? कोणते स्पर्धक असणार? जाणून घ्या एका क्लिकवर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: लॉकर फोडणाऱ्या टोळीला बँकेची खडान् खडा माहिती, कोट्यवधींचा मुद्देमाल लंपास; सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2026 14:09 IST

लॉकर व स्ट्राँग रूमला प्लायवूडचे दरवाजे : सुरक्षारक्षकांचा अभाव

आटपाडी : आटपाडी तालुक्यातील झरे येथील सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या शाखेत बुधवारी मध्यरात्रीनंतर अज्ञात चोरट्यांनी घातलेला दरोडा केवळ चोरीपुरता मर्यादित न राहता बँकेच्या एकूणच सुरक्षा व्यवस्थेचा फोलपणा उघड करणारा ठरला आहे. ग्राहकांचे लॉकर फोडून सुमारे कोट्यवधींच्या सोन्या-चांदीचा मुद्देमाल लंपास झाल्याची तक्रार बँकेच्या अधिकाऱ्यांनी आटपाडी पोलिस ठाण्यात दाखल केली आहे.विशेष म्हणजे झरे येथील बँकेत यापूर्वीही चोरीच्या प्रयत्नाचा अनुभव घेतलेली असताना, आवश्यक त्या सुरक्षात्मक उपाययोजना करण्यात आल्याचे कुठेही दिसून येत नाही. बँकेच्या पाठीमागील बाजूस थेट खिडकी असणे, ही बाब सुरक्षेच्या दृष्टीने धोकादायक असतानाही ती खिडकी आजतागायत कायम कशी ठेवण्यात आली? असा सवाल आता उपस्थित केला जात आहे.बँकेची स्ट्राँग रूम आणि लॉकर रूम ही सिमेंट काँक्रीटने बांधलेली असणे आणि त्यांचे दरवाजे अतिशय मजबूत, लोखंडी व सुरक्षित असणे अपेक्षित असते. मात्र, प्रत्यक्षात झरे शाखेतील स्ट्राँग रूम व लॉकर रूमचे दरवाजे साध्या प्लायवूडचे असल्याचे चित्र समोर आले आहे.या शाखेत नामवंत कंपनीचे दोन लॉकर असून, त्यापैकी एका लॉकरला गॅस कटरने कापण्यात आल्याची नोंद फिर्यादीत आहे. यामुळे ‘ग्राहकांच्या मौल्यवान वस्तू खरोखर सुरक्षित होत्या का?’ हा प्रश्न अधिक तीव्र झाला आहे.सोळा शाखा, पण सुरक्षारक्षक फक्त दोन ठिकाणीआटपाडी तालुक्यात सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या एकूण सोळा शाखा आहेत. यापैकी केवळ आटपाडी शहर व आटपाडी मार्केट यार्ड या दोनच शाखा स्वतःच्या जागेत, स्वतःच्या इमारतीत असून, त्याठिकाणी सुरक्षारक्षक नेमण्यात आले आहेत. उर्वरित सर्व शाखा भाड्याच्या इमारतींमध्ये चालवल्या जात असून, एकाही शाखेत सुरक्षारक्षक नाही, ही बाब अत्यंत गंभीर मानली जात आहे.मनुष्यबळाचाही अभावझरे शाखेत एकूण फक्त तीन कर्मचारी कार्यरत आहेत. शाखाधिकारी हेच कॅशिअरचे काम पाहतात, एक लिपिक आणि एक शिपाई एवढाच संपूर्ण कारभार. एवढ्या तोकड्या मनुष्यबळावर ग्राहकांच्या कोट्यवधींच्या ठेवी व मौल्यवान वस्तूंची जबाबदारी टाकणे म्हणजे धोक्याला आमंत्रण देण्यासारखेच असल्याची प्रतिक्रिया उमटत आहे.आरबीआयचा नियम काय ?लॉकरमधील मुद्देमालावर कोणताही थेट विमा नसल्याचे आरबीआयच्या नियमांमध्ये स्पष्ट आहे. मात्र, बँकेत चोरी होऊन लॉकर फोडले गेले आणि मुद्देमाल सापडला नाही, तर संबंधित लॉकरधारकास लॉकरच्या वार्षिक भाड्याच्या शंभरपट रक्कम नुकसानभरपाई म्हणून मिळू शकते. जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या लॉकरचे वार्षिक भाडे साधारणतः ८०० ते २,००० रुपये, तर डिपॉझिट १० ते २५ हजार रुपये इतके आहे. म्हणजेच कोट्यवधींच्या नुकसानीपुढे ही भरपाई अत्यंत तोकडी ठरणार आहे.

ग्राहकांच्या वेदना : ‘आमचे कष्ट कुणाकडे सुरक्षित?’याबाबत लॉकरधारक वर्षा पुकळे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता, त्यांनी व्यथित शब्दांत भावना व्यक्त केल्या. “मी, माझी आई आणि वहिनी यांनी कष्टाने कमावलेल्या पैशातून घेतलेले दागिने सुरक्षित राहावेत म्हणून बँकेच्या लॉकरमध्ये ठेवले होते. बँकेवर विश्वास ठेवून आम्ही तेथे दागिने ठेवले, मग आमचे सोने अशा सहजपणे कसे नेले गेले? लॉकर सुरक्षित नव्हते तर मग आमचे दागिने का ठेवून घेतले?” असा थेट सवाल त्यांनी उपस्थित केला.

बँक प्रशासनाची भूमिकासांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे आटपाडी तालुका विभागीय अधिकारी हरुण जमादार यांनी सांगितले की, झरे शाखेचे शाखाधिकारी हणमंत गळवे यांनी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद केला आहे. तपास सुरू असून, पुढील कारवाई पोलिसांकडून केली जात आहे. ग्राहकांनी विश्वासाने बँकेत ठेवलेली आयुष्यभराची पुंजी सुरक्षित नसेल, तर सामान्य नागरिकांनी नेमका विश्वास कुणावर ठेवायचा, असा प्रश्न आता आटपाडी तालुक्यातील प्रत्येक बँक खातेदार विचारू लागला आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Bank Robbery Exposes Security Lapses; Crores Looted, Questions Raised.

Web Summary : A daring robbery at Sangli Zilla Bank's Zare branch exposed security flaws. Lockers were breached, crores stolen. Lack of security, inadequate staffing, and weak infrastructure raised concerns about customer safety and RBI guidelines. Victims question bank's responsibility.