शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

चार श्रमसंहितांविरोधात बँक, आशा वर्कर्स, बांधकाम कामगारांचा संप; सांगलीत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन 

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2026 18:41 IST

पाच हजारांहून अधिक कामगारांचा सहभाग

सांगली : देशातील कामगारांवर ‘गुलामगिरी’ लादणाऱ्या चार श्रमसंहिता त्वरित रद्द कराव्यात, या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गुरुवारी दुपारी विविध कामगार संघटनांनी निदर्शने करुन शासनाचे मागण्यांकडे लक्ष वेधून घेतले. देशव्यापी संपात जिल्ह्यातील बँक कर्मचारी, आशा वर्कर्ससह पाच हजारांवर बांधकाम कामगार संपात सहभागी झाले होते.महाराष्ट्र राज्य आशा गटप्रवर्तक व आरोग्य कर्मचारी संघटना, निवारा बांधकाम कामगार संघटना, बँक एम्प्लॉईज युनियन, शासकीय-निमशासकीय कर्मचारी संघटना, शिक्षक फेडरेशन व पेन्शनर्स श्रमिक संघटनांनी संयुक्तपणे निदर्शने केली. निदर्शनानंतर आंदोलकांनी जिल्हाधिकारी यांना मागण्याचे निवेदन दिले.या निवेदनात म्हटले की, चार श्रमसंहितांची अंमलबजावणी झाल्यास कामगारांचे मूलभूत हक्क धोक्यात येणार आहे. देशातील सर्व केंद्रीय कामगार संघटनांचा विरोध असतानाही केंद्र सरकार जबरदस्तीने या संहितांची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न करीत आहे, याचा आम्ही तीव्र निषेध करतो. चार श्रमसंहितांमुळे ३० महत्त्वाचे कामगार कायदे रद्द होणार आहेत. इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा कायदा कमजोर करून तो दोन संहितांमध्ये विभागण्यात आला आहे. मूळ कायद्यातील विस्तृत आणि कामगार हिताच्या तरतुदी काढून टाकून केवळ त्रोटक सुविधा ठेवल्या आहेत. त्यामुळे देशातील आठ कोटी बांधकाम कामगारांचे भवितव्य धोक्यात येणार आहे. यामुळे मूळ कायद्यात बदल करू नये, अशी मागणी आहे.आंदोलनाचे नेतृत्व कॉ. शंकर पुजारी, पी. एन. काळे, गोपाळ पाटील, बँक कर्मचारी युनियनचे सतीश पाटील, आशा वर्कर युनियनच्या गटप्रवर्तक मनीषा मुरसे, आशा महिला स्वाती सवणे, मनीषा कदम, स्मिता पाटील, राधिका राजमाने व वनिता गंजागोर यांनी केले. बांधकाम कामगार संघटनेच्या वतीने संतोष बेलदार, राजेंद्र दिवटे व वैभव बडवे आदींनी सहभाग घेतला.

English
हिंदी सारांश
Web Title : Workers Strike Against Labor Codes; Protest in Sangli.

Web Summary : Bank, ASHA, and construction workers in Sangli protested labor codes, fearing exploitation. Unions demanded the codes' repeal, citing threats to worker rights and welfare. Thousands participated, submitting a memorandum to the Collector.