शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सांगली-कोल्हापूर रस्त्याला मुहूर्त कधी?, महामार्ग प्राधिकरणाचे अक्षम्य दुर्लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 18:57 IST

आणखी किती बळी घेणार?

सांगली : सांगली ते कोल्हापूर या अत्यंत महत्त्वाच्या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्ड्यांचे सापळे तयार झाले आहेत. या रस्त्यावरून सुरक्षितरीत्या प्रवास करणे, म्हणजे मोठी लढाई जिंकण्यासारखी स्थिती आहे. सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही जिल्ह्यांतील आमदार, खासदारांच्या लेखी हा रस्ता पूर्णत: दुर्लक्षित आहे. त्यामुळे महामार्ग प्राधिकरणानेही त्याकडे दुर्लक्षाचेच धोरण अवलंबल्याचे दिसत आहे.सांगली-कोल्हापूरदरम्यान दररोज हजारो वाहने धावतात. हे पाहता त्याचा दर्जा किमान राज्य महामार्गासारखा असायला हवा. पण, प्रत्यक्षात चित्र उलटे आहे. सांगलीपासून अतिग्रेपर्यंत सर्वत्र मोठमोठे खड्डे पडले आहेत. काही खड्डे तर फुटभर खोलीचे आहेत. दोन्ही बाजूंच्या बाजूपट्ट्या खचल्या आहेत. अनेक ठिकाणी रस्ता तुटला आहे. चौंडेश्वरी सुतगिरणीजवळ तर सर्वत्र खड्डेच खड्डे निर्माण झाल्याने धुळीचे लोट उठतात.अंकली ते जयसिंगपूरदरम्यानही शोचनीय अवस्था आहे. उदगावमध्ये बंद पथकर नाक्याजवळ रस्त्यावर थोडेही डांबर उरलेले नाही. जयसिंगपूर ते इचलकरंजी फाटा यादरम्यान मध्येच येणारा भलामोठा खड्डा एखाद्या दुचाकीस्वाराच्या मृत्यूला कधीही कारणीभूत होऊ शकतो. ते भरण्याची तसदी महामार्ग प्राधिकरण घेताना दिसत नाही. दोन महत्त्वाच्या जिल्ह्यांना जोडणारा तितकाच महत्त्वाचा रस्ता दुरुस्त का केला जात नाही? असा खडा सवाल प्राधिकरणाला विचारण्याचे धाडस सांगली, कोल्हापूरचे लोकप्रतिनिधी करत नाहीत, हे प्रवाशांचे दुर्दैव आहे.

जबाबदारी सांगलीच्या की कोल्हापूरच्या नेत्यांची?मागण्यांच्या पूर्ततेसाठी दणकेबाज आंदोलनांची मर्दुमकी दाखविणाऱ्या कोल्हापूरच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना सांगली रस्त्याची दुरवस्था दिसत नाही का?, असा प्रश्न आहे. तर, सांगलीचे नेते महागड्या आरामदायी गाड्यांमधून प्रवास करत असल्याने त्यांना खड्ड्यांचा जाच होत नसावा, अशी शंका निर्माण होत आहे.

रस्ता करायचा नव्हता, तर महामार्गने घेतला कशासाठी?सुमारे पाच-सहा वर्षांपूर्वी हा रस्ता राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने ताब्यात घेतला, तेव्हापासून या रस्त्याचे रडगाणे सुरू झाले आहे. तत्पूर्वी सांगलीपर्यंतचा भाग सांगलीचा सार्वजनिक बांधकाम तंदुरुस्त ठेवायचा. कोल्हापूरच्या भागावर तेथील सार्वजनिक बांधकामचे लक्ष होते. प्राधिकरणाने तो ताब्यात घेतल्यापासून त्याचे रडगाणे सुरू झाले आहे.

आणखी किती बळींची प्रतीक्षा?नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात अंकली पुलावरून चारचाकी पात्रात कोसळून सांगलीतील तिघांचा बळी गेला होता. त्यानंतर महामार्ग प्राधिकरणाला जाग येऊन पुलावर बॅरिकेड्स बसविले गेले. सांगली-कोल्हापूर रस्त्यावरही अशाच बळींची प्राधिकरणाला प्रतीक्षा आहे का?, असा प्रश्न आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरroad transportरस्ते वाहतूकhighwayमहामार्ग