शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

हुंडा देणे-घेणे, प्री-वेडिंग टाळा; वैष्णवी हगवणे प्रकरणानंतर सांगलीत मराठा समाजाकडून लग्नाची आचारसंहिता

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2025 18:30 IST

सांगली : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाविषयी संताप व निषेध व्यक्त करत सांगलीच्या मराठा समाजाने लग्नांसाठी आचारसंहिता तयार केली ...

सांगली : पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणाविषयी संताप व निषेध व्यक्त करत सांगलीच्यामराठा समाजाने लग्नांसाठी आचारसंहिता तयार केली आहे. लग्नसोहळा पार पाडताना रूढी-परंपरेला फाटा द्यावा, साधेपणाने लग्नकार्य व्हावे, प्री-वेडिंगसारखे खर्चिक प्रकार टाळावे, अशा गोष्टींचा त्यात समावेश करण्यात आला आहे.मराठा समाज संस्थेचे सरचिटणीस जयवंत सावंत, ॲड. विलास हिरूगडे-पवार, ॲड. उत्तमराव निकम आदींनी संयुक्तपणे पत्रकार परिषदेत याबाबतची माहिती दिली. ते म्हणाले, वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणानंतर सर्व सामाजिक क्षेत्रात वेगळी चर्चा सुरू आहे. त्यातून मराठा समाजात लग्नाचे प्रदर्शन होत आहे, असे चित्र उभे केले आहे. रूढी, परंपरा नष्ट होण्यासाठी मराठा समाज संस्था गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहे. हुंडा प्रथा नष्ट झाली पाहिजे. लग्नातील खर्च आटोक्यात आणला पाहिजे.श्राद्धाविधीवरील खर्च कमी व्हावा, तीन दिवसांत सर्व श्राद्धविधी व्हावेत. शेतीकडे व्यवसाय म्हणून बघितले पाहिजे, अशा गोष्टींसाठी उपक्रम राबविले. हगवणे परिवाराचा आम्ही निषेध व्यक्त करतो. त्या कुटुंबावर बहिष्कार टाकला पाहिजे. मराठा समाजाने आता लग्नसोहळे कशा प्रकारे करावेत, यासाठी आचारसंहिता बनविली आहे. ही आचारसंहिता समाजातील सर्व कुटुंबापर्यंत घेऊन जाऊन प्रबोधन केले जाईल.

यावेळी रोहित पाटील, दत्तात्रय सावंत, चकोर पाटील, रघुनाथराव पाटील, शशिकांत डांगे, नितीन शिंदे, चंद्रकांत पाटील, विजय भगत, अभिजीत पाटील, ए. डी. पाटील, प्रदीप कार्वेकर, ज्ञानेश पवार, हरिदास पाटील, अशोक पाटील, उदय निकम, विशाल पाटील, पंडितराव पाटील, अमोल चव्हाण, प्रकाश पाटील, राजेंद्रसिंह पाटील, रवींद्र खिलारे, विकास पाटील, दीपक मोरे आदी उपस्थित होते.

आचारसंहिता कशी असेल

  • लग्न शंभर लोकांच्या उपस्थितीत साधेपणाने करावे.
  • हुंडा देणे व घेणे बंद करावे.
  • प्री-वेडिंग पद्धत चुकीची असल्याने तिला पायबंद घालावा.
  • आहेर देणे व घेणे टाळावे.
  • लग्नात पारंपरिक वाद्यांचा वापर करावा.
  • कर्जे काढून लग्नसोहळा करू नये.
  • हिडीस नृत्यासारखे प्रकार टाळावेत.
  • फेटा फक्त नवरदेवाला बांधावा.
  • भेट म्हणून वृक्षरोप, पुस्तके द्यावीत.
  • लग्नातील खर्चाऐवजी ठेव पावती करावी.
  • साखरपुडा, हळद, लग्न एकाच दिवशी करावेत.
  • जेवणात फक्त पाच पदार्थ ठेवावेत.
  • इतरांची नक्कल न करता ऐपतीप्रमाणे खर्च करावा.
  • वधू-वरांना उचलून घेण्याची प्रथा टाळावी.
टॅग्स :SangliसांगलीVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेmarathaमराठाmarriageलग्न