शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या एका जागेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ४ नावांवर चर्चा, विक्रम काकडे यांचं नाव आघाडीवर
2
'चंद्रकांता' फेम भरत कपूर यांचं निधन, वयाच्या ८६ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास; अभिनयाचा चार दशकांचा प्रवास थांबला
3
"न कळत सारं घडलं..." लाजिरवाण्या पराभवानंतर अक्षर पटेल झाला 'कावरा बावरा', म्हणे...
4
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
5
Bhuvneshwar Kumar : स्विंगचा किंग भुवीची पॉवरप्लेमध्ये कमाल! एकाच डावात दोन खास विक्रमांना गवसणी
6
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
7
चंद्रपुरातील किडनी विक्री प्रकरणात रविंद्रपाल सिंग यांना जामीन नाहीच, हायकोर्टाचा निर्णय; सखोल तपासासाठी अर्ज फेटाळला
8
एमआयडीसीतील फॅक्टरींमध्ये अनेक कामगारांचे पोलिस व्हेरिफिकेशनच नाही; ना कागदपत्र, ना कुणाची नोंद
9
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
10
२६ कामगारांचा बळी घेणाऱ्या एसबीएल कंपनीतील पाच पदाधिकाऱ्यांना दणका; उच्च न्यायालयाचा अटकपूर्व जामिनास नकार
11
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार, संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
12
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
13
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
14
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
15
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
16
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
17
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
18
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
19
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
20
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
Daily Top 2Weekly Top 5

विट्यातील ‘लॉज’वर होतेय ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण

By admin | Updated: August 28, 2015 22:58 IST

लेखापरीक्षकांचा मुक्काम : अजब दफ्तर तपासणी

दिलीप मोहिते-विटा  -ग्रामसेवकांसह गटविकास अधिकाऱ्यांनी मुख्यालय सोडून सांगली, विट्यात मुक्काम ठोकला असतानाच, आता खानापूर तालुक्यातील ११ ते १२ ग्रामपंचायतींची शासकीय वार्षिक दफ्तर तपासणी लेखापरीक्षकांनी शहरातील एका खासगी लॉजवर सुरू केली आहे. ग्रामपंचायतींची दफ्तर तपासणी संबंधित कार्यालयातच करण्याचे निर्बंध असताना, लेखापरीक्षकांनी खानापूर पंचायत समितीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या लॉजमध्ये मुक्काम ठोकून तेथेच दफ्तरांचे गाठोडे घेऊन येण्याचे फर्मान काढले आहे. खानापूर तालुक्यातील भाळवणी, लेंगरेसह खानापूर पूर्व भागातील ११ ते १२ ग्रामपंचायतींचे २०१४-१५ चे वार्षिक लेखापरीक्षण सुरू झाले आहे. त्यासाठी शासकीय लेखापरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित ग्रामपंचायतीच्या मुख्यालयात जाऊन कार्यालयातच वार्षिक दफ्तर तपासणीचे निर्बंध आहेत, परंतु या लेखापरीक्षकांनी शहरातील एका लॉजवर तळ ठोकला आहे. त्यामुळे ज्या ग्रामपंचायतीचे लेखापरीक्षण होणार आहे, तेथील ग्रामसेवक किंवा कर्मचाऱ्याला दफ्तराचे ओझे घेऊन लॉजवर यावे लागत आहे. लॉजवर थांबून लेखापरीक्षण करणाऱ्या या साहेबांनी आतापर्यंत पाच ते सहा ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण पूर्ण केले आहे. लॉजच्या वातानुकूलित खोलीत बसून लेखापरीक्षण सुरू असले तरी, साहेबांपर्यंत ग्रामपंचायतींचे दफ्तर पोहोचवताना ग्रामसेवक व संबंधित कर्मचाऱ्याला घाम फुटू लागला आहे.याबाबत खानापूर पंचायत समितीतील विस्तार अधिकाऱ्यांकडे चौकशी केली असता, त्यांना तालुक्यातील कोणत्या व किती ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण सुरू आहे, याची माहिती नसल्याचे सांगण्यात आले. ज्या ग्रामपंचायतींचे लेखापरीक्षण होणार आहे, त्यांच्या ग्रामसेवकांसमोर लॉजचे भाडे अदा करण्याचे संकट उभे राहणार असल्याचे समजते. यामुळे लेखापरीक्षणाचा ग्रामसेवकांनी धस्का घेतला आहे.चौकशीची मागणीदि. १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१५ या वर्षातील लेखापरीक्षण सुरू आहे. हे आर्थिक वर्ष संपून पाच महिने पूर्ण झाले तरी मागील आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण टिपण अद्यापही हाती लागलेले नाही. त्यामागे लेखापरीक्षकांची संख्या कमी असल्याचे कारण असले तरी, प्रत्येक ग्रामपंचायतीत जाऊन लेखापरीक्षण होणे बंधनकारक असताना, लॉजवर ठिय्या मारून तेथे ग्रामपंचायतीचे दफ्तर घेऊन बोलाविणे कितपत योग्य आहे?, असा सवाल ग्रामस्थांनी उपस्थित केला आहे. त्यामुळे संबंधित लेखापरीक्षकांची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे.