शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

तहसीलची भिंत पाडून ट्रक पळविण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2020 16:31 IST

तासगाव : वाळू तस्करीप्रकरणी तहसीलदार कल्पना ढवळे यांनी कारवाई करून ताब्यात घेतलेला ट्रक गुरुवारी रात्री वाळू तस्करांनी पळविण्याचा प्रयत्न ...

ठळक मुद्देतहसीलची भिंत पाडून ट्रक पळविण्याचा प्रयत्नवाळू तस्करीप्रकरणी तहसीलदार कल्पना ढवळे यांनी केली होती कारवाई

तासगाव : वाळू तस्करीप्रकरणी तहसीलदार कल्पना ढवळे यांनी कारवाई करून ताब्यात घेतलेला ट्रक गुरुवारी रात्री वाळू तस्करांनी पळविण्याचा प्रयत्न केला. यावेळी अंदाज न आल्याने तो ट्रक तहसील कार्यालयाच्या भिंतीला धडकल्याने भिंत कोसळली. या अयशस्वी प्रकारानंतर संबंधितांनी धूम ठोकली.याप्रकरणी ट्रक मालक नीलेश ऊर्फ चिक्या नरसू फाकडे (रा. फाकडे गल्ली, हरिपूर, ता. मिरज) व वाहन चालक सोमनाथ बाळू लोहार (रा. कुपवाड) या दोघांवर तासगाव पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.तहसीलदार कल्पना ढवळे यांना सोमवारी नागाव-निमणी येथील पाचवा मैल - सांगली मार्गावर विनापरवाना वाळू वाहतूक करीत असलेला ट्रक (क्र. एमएच ४३ यु ९४४९) आढळून आला होता. हा ट्रक नागाव व ढवळी येथील तलाठ्यांनी तहसील कार्यालयात उभा केला होता.गुरुवारी मध्यरात्री पावणेदोन वाजण्याच्या दरम्यान नीलेश फाकडे व बाळू लोहार यांनी तहसील कार्यालयाच्या आवारातून हा ट्रक पळवून नेण्याचा प्रयत्न केला. मात्र ट्रक पाठीमागे घेत असताना तहसील कार्यालयाच्या समोरील कंपाऊंड भिंतीवर धडकून भिंत कोसळली.

या प्रकाराने घाबरलेल्या दोघांनी ट्रकमधून उड्या टाकत धूम ठोकली. याप्रकरणी शासकीय खनिजाची चोरी करून पळवून नेण्याचा प्रयत्न केल्याचा व शासकीय मालमत्तेचे नुकसान केल्याचा संबंधितावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याची फिर्याद तहसील कार्यालयातील सुरक्षा रक्षक सतीश उपाध्ये यांनी दिली आहे. 

टॅग्स :sandवाळूTahasildarतहसीलदारPoliceपोलिसSangliसांगली