शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

उल्हासनगरात दुकानाचा ताबा घेण्याचा प्रयत्न; सांगली जिल्ह्यातील एकास अटक, इतर साथीदार पसार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2025 16:37 IST

धारदार कुकरी जप्त, पसार संशयितांचा शोध

सांगली : उल्हासनगर (जि. ठाणे) येथे दुकानाचा ताबा घेण्यासाठी गेलेल्या माधवनगर (ता. मिरज) येथील राकेश प्रकाश तिरमारे (वय ४०, रा. गुरुवार पेठ, माधवनगर) याला उल्हासनगर पोलिसांनी अटक केली. तिरमारे यांच्याकडून धारदार कुकरी जप्त करण्यात आली आहे. यावेळी तिरमारे याचे चार साथीदार फरार झाले.उल्हासनगर येथील कापड व्यापारी सागर केसवानी आणि माधवनगर येथील बाफना यांच्यात व्यवहारातील आर्थिक देवघेवीतून वाद सुरू आहे. सागर केसवानी यांनी जीन्स कापडाची ऑर्डर देऊन माल घेऊन गेल्यानंतर १९ लाख ६४ हजार रुपये परत केले नसल्यामुळे ममता राजेंद्रकुमार बाफना (वय ५२, रा. मंगळवार पेठ, माधवनगर) यांनी केसवानीविरुद्ध कुपवाड एमआयडीसी पोलिस ठाण्यात १५ दिवसांपूर्वी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. सागर केसवानी यांनी अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज दाखल केला आहे.एकीकडे हा वाद सुरू असतानाच केसवानी यांच्या दुकानाचा ताबा घेण्यासाठी संशयित राकेश तिरमारे आणि त्याचे साथीदार उल्हासनगर येथे ८ ऑगस्ट रोजी गेले होते. संशयितांनी केसवानी यांच्या दुकानाचा फलक काढून तेथे बाफना यांच्या फर्मचा फलक लावला. तसेच सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तोडफोड केली. स्वत:चे कॅमेरे लावले. दि. ९ रोजी रक्षाबंधनाची सुटी होती. परंतु माल पाठवायचा असल्यामुळे केसवानी यांच्या पत्नी केसर सागर केसवानी (वय ३०) या दि. ९ रोजी दुकानात गेल्यानंतर त्यांना संशयितांनी दुकानाचा ताबा घेतल्याचे निदर्शनास आले. त्यांनी उल्हासनगर येथील हिललाईन पोलिस ठाण्यास हा प्रकार कळवला. त्यानंतर पोलिसांना घेऊन दुकान गाठले. यावेळी पोलिसांनी राकेश तिरमारे याला कुकरीसह ताब्यात घेतले तर त्याचे साथीदार पळून गेले. याप्रकरणी हिललाइन पोलिस ठाण्यात तिरमारे याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

पसार संशयितांचा शोधहर्षल बाफना आणि साथीदारांनी दुकान ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला म्हणून केसर केसवानी यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी राकेश तिरमारे याला अटक केली आहे. तर इतर साथीदारांचा हिललाईन पोलिसांकडून शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले.