शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हनुमान चालीसा आणि भोंग्यावरून जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न - जयंत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2022 13:25 IST

त्यांचा या मागील हेतू काय? हे सुज्ञ जनतेने ओळखले असून त्यांचा हा डाव राज्यातील जनताच उधळून लावेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

इस्लामपूर : हनुमान चालीसा आणि भोंग्यांची भाषा करून समाजात तेढ निर्माण करण्याचा उद्योग काही मंडळी करीत आहेत असा टोला जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी नामोल्लेख टाळून मनसे आणि भाजपला लगावला. मात्र त्यांचा या मागील हेतू काय? हे सुज्ञ जनतेने ओळखले असून त्यांचा हा डाव राज्यातील जनताच उधळून लावेल असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.येथील ख्वाजा गरीब नवाज सोशल ट्रस्टच्यावतीने मोमीन मोहल्ला येथे इफ्तार पार्टीचे आयोजन केले होते. याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी नगराध्यक्ष मुनीर पटवेकर, राष्ट्रवादीचे राज्य सरचिटणीस ऍड. चिमण डांगे, जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब पाटील, तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, शहराध्यक्ष शहाजी पाटील, ओबीसी सेलचे राष्ट्रीय सहसचिव अबीद मोमीन, महिला शहराध्यक्षा रोझा किणीकर, युवक शहराध्यक्ष सचिन कोळी,  माजी नगरसेवक पिरअली पुणेकर आदी. उपस्थित होते.मंत्री पाटील म्हणाले, आपण वर्तमान पत्र व टी.व्ही.चॅनेलवरून राज्यातील राजकीय, सामाजिक वातावरण वाचत असाल, पहात असाल. काही मंडळी हनुमान चालीसा आणि भोंग्यांची भाषा करीत आहेत. या मंडळींचा हेतू शुद्ध नाही. त्यांना यातून समाजात तेढ निर्माण करून आपली राजकीय पोळी भाजायची आहे हे स्पष्ट आहे. मात्र राज्यातील सुज्ञ जनता या मंडळींचा हा डाव हाणून पडतील. ज्यांची केंद्रात सत्ता आहे, आणि जे राज्यात सत्ता घेण्यासाठी अस्वस्थ आहेत, ती मंडळी राज्यास बदनाम करून कायदा व सुव्यस्थेचा प्रश्न निर्माण करीत आहेत. यावेळी त्यांनी येणाऱ्या रमजान ईदच्या शुभेच्छा दिल्या.

टॅग्स :SangliसांगलीJayant Patilजयंत पाटीलBJPभाजपाMNSमनसे