शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: आटपाडी बलात्कारप्रकरणी संशयित संग्राम देशमुख याला अटक, तीन दिवस पोलिस कोठडी 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2024 17:59 IST

आटपाडी : आटपाडी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी जिम चालक संग्राम देशमुख याला पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. त्याला न्यायालयात ...

आटपाडी : आटपाडी येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कारप्रकरणी जिम चालक संग्राम देशमुख याला पोलिसांनी मंगळवारी रात्री अटक केली. त्याला न्यायालयात हजर केले असता, १३ सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली.दोन दिवसांपूर्वी आटपाडी पोलिस ठाण्यामध्ये जिम चालक संग्राम देशमुख याच्याविरोधात अल्पवयीन मुलीचे अपहरण व बलात्काराचा गुन्हा दाखल झाला हाेता. हा गुन्हा दाखल झाल्यापासून संशयित संग्राम देशमुख हा फरार होता. अकलूज परिसरात एका हॉटेलसमोर गुन्ह्यात वापरलेली चारचाकी लावून ताे माळशिरस रस्त्यावर दुचाकीवरून फिरत असल्याची माहिती पाेलिसांना मिळाली. आटपाडी पोलिसांनी तत्काळ कारवाई करत त्याला अटक केली.यावेळी गुन्ह्यात वापरलेल्या माेटारीची माहिती देण्यास त्याने टाळाटाळ केली. मात्र, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने माेटार पोलिसांच्या ताब्यात दिली. रात्री उशिरा आटपाडी पोलिस ठाण्यात त्याला हजर करण्यात आले.त्याची साथीदार परिचारिका सुमित्रा लेंगरे हिला यापूर्वीच अटक करण्यात आली आहे. तिला चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. दरम्यान, जिम चालक असलेल्या संग्राम देशमुख याने अन्य काही महिला व मुलींशी गैरकृत्य केल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

बलात्कार प्रकरणातील संशयित जिम चालक संग्राम देशमुख याला अटक करण्यात आली आहे. आरोपीने अन्य काही महिला, मुलींबाबत काही गैरकृत्य केले असेल, तर त्यांनी पोलिस ठाण्याशी संपर्क करावा. तक्रार दाखल करावी. पोलिस ठाण्यात समक्ष येणे अशक्य असल्यास तक्रारदार मुलींनी सांगितलेल्या ठिकाणी जाऊन त्यांची तक्रार घेण्यात येईल. त्यांचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल. - विनय बहीर, पोलिस निरीक्षक, आटपाडी

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस