आटपाडीत ३७ संस्था बिनविरोध
By Admin | Updated: January 26, 2015 00:39 IST2015-01-26T00:38:16+5:302015-01-26T00:39:42+5:30
सहकारला अच्छे दिन : विधानसभेनंतर नेत्यांना शहाणपण

आटपाडीत ३७ संस्था बिनविरोध
आटपाडी : खानापूर-आटपाडी विधानसभा मतदारसंघात यावेळी झालेल्या अभूतपूर्व चुरशीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सहकारी संस्थांच्या निवडणुकीत प्रचंड चुरस निर्माण होण्याऐवजी गावोगावच्या कारभाऱ्यांनी या निवडणुकीत धडा घेतल्याचे स्पष्ट होत आहे. तालुक्यातील ५५ सहकारी संस्थांपैकी तब्बल ३७ संस्थांची निवडणूक बिनविरोध झाली आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी राज्य निवडणूक प्राधिकरण स्थापन करण्यात आले आहे. सर्व सहकारी संस्थांच्या निवडणुका या प्राधिकरणामार्फत घेण्यात येत आहेत. यंदा आटपाडी तालुक्यातील ‘ब’ वर्गातील १७, ‘क’ वर्गातील ५५ आणि ‘ड’ वर्गातील ३१ संस्थांच्या निवडणुका होणार आहेत.
विशेष म्हणजे यावेळी विधानसभेच्या चौरंगी लढतीचा उलटा परिणाम या सहकारी संस्थांच्या निवडणुकीवर झालेला पाहायला मिळत आहे. प्रतिष्ठेची निवडणूक करून त्यासाठी होणारी कडवी गटबाजी, बेफाम पैसा खर्च आणि गावा-गावात निर्माण होणारी कटुता, शिवाय विजयी कोण होणार हेही अनिश्चित. त्यामुळे सामंजस्याने सर्व गट-तट विसरून बिनविरोध निवडणुका करण्याकडे कारभाऱ्यांचा कल असल्याचे स्पष्ट झाले आहे.
बिनविरोध झालेल्या संस्था
पळसखेल विकास सेवा संस्था, घरनिकी पतसंस्था, धुळाजीराव झिंबल पतसंस्था- लिंगीवरे, कृष्णा ग्रामीण पतसंस्था, शेटफळे, उमादेवी पत्की पतसंस्था करगणी, संजीवनी लोणार समाज पतसंस्था आटपाडी, बाबासाहेब देशमुख माणगंगा सेवक संस्था आटपाडी, आटपाडी विद्यार्थी ग्राहक भांडार, चंद्रभागा महिला विकास संस्था दिघंची, आर. आर. पाटील गारमेंट मॅन्युफॅक्चरिंंग सोसायटी दिघंची, सिद्धनाथ शेती उपयोगी साधन पुरवठा खुरसुुंडी, यशवंत विजय विकास संस्था माळेवाडी, भिंगेवाडी विकास संस्था, प्रगती पतसंस्था शेटफळे, अण्णासाहेब लेंगरे पतसंस्था आटपाडी, बाळेवाडी विकास संस्था, बिरुदेव विकास सेवा संस्था कुरुंदवाड, अहिल्यादेवी होळकर विकास संस्था निंबवडे, आटपाडी व्यापारी ग्रामीण पतसंस्था, धावडवाडी विकास संस्था, जकाईदेवी विकास संस्था मानेवाडी, विठ्ठल विकास संस्था ओटेवाडी, वसंत पतसंस्था दिघंची, जयभवानी विकास संस्था शेटफळे, राजेंद्रअण्णा देशमुख ग्राहक संस्था करगणी, लोकमान्य विकास संस्था निंबवडे, सिद्धनाथ विकास संस्था निंबवडे, वि. द. ऐवळे मागासवर्गीय औद्योगिक संस्था राजेवाडी, भैरवनाथ विकास संस्था शेटफळे, गीतलक्ष्मी महिला औद्योगिक संस्था आटपाडी, विजयादेवी महिला विकास संस्था य. पा. वाडी, माणगंगा ऊस तोडणी वाहतूक यंत्रणेचे घटक संस्था आटपाडी, माऊली स्वयंरोजगार संस्था लेंगरेवाडी, जयंत पाटील स्वयंरोजगार संस्था, श्री समर्थ स्वयंरोजगार संस्था, सिद्धिविनायक संस्था, श्री भैरवनाथ संस्था आटपाडी.)