शहरं
Join us  
Trending Stories
1
युक्रेन युद्धानंतर पुतिन पहिल्यांदाच भारत दौऱ्यावर येणार, अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होणार
2
शटडाऊनमुळे अमेरिका मोठ्या संकटात; ७.५० लाख सरकारी कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
3
राशीभविष्य २ ऑक्टोबर २०२५: आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील, नशिबाची साथ मिळेल
4
टीका, हल्ले झाले तरी संघाने कधीही कटुता बाळगली नाही; पंतप्रधान मोदी यांचे प्रतिपादन : ‘राष्ट्र प्रथम’ हे संघाचे तत्त्व महत्त्वाचे
5
केंद्रीय मंत्रिमंडळाची दसरा भेट : ४९.१९ लाख केंद्रीय कर्मचाऱ्यांसह ६८.७२ लाख निवृत्तीवेतनधारकांना मिळणार लाभ
6
आज गाजणार मेळावे! वाचा महाराष्ट्रातील सर्व महत्त्वाच्या सभांचे वेळापत्रक आणि प्रमुख मुद्दे
7
भ्रष्टाचारात महाराष्ट्र सलग तिसऱ्या वर्षी देशात टॉप; पुण्यात सर्वाधिक लाचखोर!
8
ईएमआय भरले म्हणून पती संयुक्त मालमत्तेवर एकट्याने मालकीचा दावा करू शकत नाही!
9
५७ केंद्रीय विद्यालयांना केंद्राने दिली मंजुरी; महाराष्ट्रातील चार जिल्ह्यांचा यादीत समावेश
10
रा. स्व. संघाने शिकवली फक्त शिस्त आणि सेवा! मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितली संघ शाखेतील प्रार्थनेची शक्ती
11
संघ शताब्दी आणि राज्यघटना; शताब्दीच्या उंबरठ्यावर रा.स्व.संघ आणि 'अमृतमहोत्सवी' संविधान!
12
अनुकंपाच्या तब्बल ५,१८७ उमेदवारांना मिळणार नियुक्तिपत्रे; एकाच दिवशी १० हजार जण नोकरीत हाेणार रुजू
13
ट्रम्प यांच्या योजनेला हमास मान्यता देईना; इस्रायलने गाझावर केलेल्या हल्ल्यात १६ जण ठार
14
"कतारवर हल्ला म्हणजे अमेरिकेवर हल्ला, पुन्हा असं घडलं तर..."; ट्रम्प यांचा इस्रायलला इशारा
15
शताब्दी वर्षात संघाचे ध्येय: 'राष्ट्रसेवेत' समाजाचा सहभाग! स्वयंसेवकांचे कुटुंब कसे बनले संघाच्या कार्याचे केंद्र?
16
"माझ्या पतीची बिनशर्त सुटका करा..."; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचे थेट राष्ट्रपतींना पत्र
17
भिवंडीतील मानकोली येथे वह्या बनवणाऱ्या कंपनीच्या गोदामाला आग; सुदैवाने जीवितहानी नाही
18
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
19
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
20
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख

अटलबिहारी वाजपेयी यांच्या आठवणीने सांगलीकर शोकाकुल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2018 00:13 IST

सांगली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगलीकर शोकाकुल झाले. अटलजींनी सांगलीला चार ते पाच वेळा भेट दिली होती. जनसंघाचे नेते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, परराष्ट्रमंत्री, विरोधी पक्षनेता आदी महत्त्वाच्या पदांवर काम करताना ते सांगलीत आले. कधी मित्राचा सन्मान करण्यासाठी, तर कधी जनसंघाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने! त्यांच्या तेव्हाच्या भाषणांची ...

सांगली : माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या निधनाचे वृत्त समजताच सांगलीकर शोकाकुल झाले. अटलजींनी सांगलीला चार ते पाच वेळा भेट दिली होती. जनसंघाचे नेते, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष, परराष्ट्रमंत्री, विरोधी पक्षनेता आदी महत्त्वाच्या पदांवर काम करताना ते सांगलीत आले. कधी मित्राचा सन्मान करण्यासाठी, तर कधी जनसंघाच्या कार्यक्रमांच्या निमित्ताने! त्यांच्या तेव्हाच्या भाषणांची आठवण आजही सांगलीकरांच्या स्मृतीत आहेत.१९६७ चे वर्ष... अटलजी पहिल्यांदा सांगलीत आले. तेव्हा ते जनसंघाचे नेते होते. जनसंघाच्या सांगली शाखेच्यावतीने ५१ हजार रुपयांची देणगी देण्याचा कार्यक्रम आखला होता. या कार्यक्रमासाठी ते सांगलीत आले. राजवाडा चौकातील जनसंघाच्या कार्यालयात हा कार्यक्रम झाला.१९७८ मध्ये अटलजी परराष्ट्रमंत्री होते. सांगलीच्या नगरवाचनालयाने गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना आजीव सदस्यत्व दिले होते. त्या कार्यक्रमासाठी अटलजी सांगलीत आले. नगरवाचनालयातील कार्यक्रमाला त्यांनी हजेरी लावली. जनसंघातून बाहेर पडून भारतीय जनता पार्टीची स्थापना झाल्यानंतर १९८५-८६ मध्ये ते मिरजेत एका सभेसाठी आल्याची आठवण प्रकाश बिरजे यांनी सांगितली.१९९५ मध्ये विरोधी पक्षनेता असताना ते सांगलीत आले. निमित्त होते... ५२ वर्षे मैत्रीचे बंध जुळलेल्या कृषी तज्ज्ञ प्र. शं. ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी सत्कार समारंभाचे. ठाकूर व अटलजी १९४२-४३ मध्ये ग्वाल्हेरला भेटले. तेथून त्यांची मैत्री सुरू झाली. ठाकूर नोकरीच्या निमित्ताने महाराष्ट्रात आले, सांगलीत स्थायिक झाले. पण त्यांच्या मैत्रीचा बंध अतूटच राहिला. यावेळी अटलजींच्याहस्ते ‘भूमिपुत्राचा सांगाती’ या ठाकूर यांच्यावरील गौरव अंकाचे प्रकाशनही करण्यात आले. ‘सांगलीत कित्येक वर्षे कृष्णामाई वाहते आहे. कृष्णामाई तीच आहे. आता तीही बदलते आहे. सरकार हे येईल, ते येईल, पक्ष हा असेल, तो असेल, पण भारतमातेची सेवा, हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे’, असा त्यांच्या भाषणाचा गोषवारा होता.त्यानंतर त्यांनी शांतिनिकेतनला आवर्जून भेट दिली. शांतिनिकेतनच्या परिसरामध्ये हुतात्म्यांच्या स्मृती तेवत ठेवणाऱ्या स्मृती स्तंभाला त्यांनी अभिवादन केले. यानंतर त्यांनी ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य पी. बी. पाटील यांच्याशी जवळपास तासभर चर्चा केली.शांतिनिकेतनची गुरु-शिष्य परंपरा त्यांनी समजून घेतलीच, पण त्यासोबत शिक्षण व्यवस्थेत काही अमूलाग्र बदल करता येतील का, याबाबतही चर्चा केली. ग्रामीण विकास, स्वयंपूर्ण खेडी, पंचायत राज, सत्तेचे विकेंद्रीकरण या महत्त्वपूर्ण विषयांवर दोघांनी अनेक महत्त्वाच्या पर्यायांवर चर्चा केली होती.