सांगली जिल्ह्यातील खटाव येथे विजयानंतर औक्षण करताना नुतन सरपंच भाजले
By शरद जाधव | Updated: December 20, 2022 21:04 IST2022-12-20T20:55:38+5:302022-12-20T21:04:09+5:30
येथे ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालानंतर विजयी सरपंचांचे औक्षण करताना, भडका उडून सरपंच भाजल्याचे घटना घडली.

सांगली जिल्ह्यातील खटाव येथे विजयानंतर औक्षण करताना नुतन सरपंच भाजले
सांगली : खटाव (ता.मिरज) येथे ग्रामपंचायत निवडणूकीच्या निकालानंतर विजयी सरपंचांचे औक्षण करताना, भडका उडून सरपंच भाजल्याचे घटना घडली. यात नुतन सरपंच रावसाहेब बेडगे जखमी झाले. त्यांच्यावर मिरज येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत.
जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणूकीची मतमोजणीची प्रक्रीया मंगळवारी पार पडली. यात विजयी उमेदवारांकडून गुलालाची उधळण करत जल्लोष करण्यात आला. खटावच्या लोकनियुक्त सरपंचपदी रावसाहेब बेडगे यांची निवड झाल्यानंतरही त्यांच्या कार्यकत्य'ांनी जल्लोष साजरा केला. ते गावात आल्यानंतर महिलांनी त्यांचे औक्षण केले.
सरकारी नोकरीच्या लालसेपोटी पतीची हत्या, मित्रासोबत रचला भयानक कट!
नेमके याचवेळी त्यांच्यावर कार्यकर्त्यांनी गुलाल फेकल्याने गुलालाचा आगीशी संपर्क आल्याने भडका उडाला व त्यात नुतन सरपंच बेडगे हे जखमी झाले. यात बेडगे यांच्या हाताला गंभीर जखम झाली आहे. यानंतर तातडीने त्यांना उपचारासाठी मिरज येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. बेडगे यांच्यासोबत असणारे अजित खटावकर, सुरेश परीट हेही यात भडाक्यामुळे जखमी झाले.