अडचणीतील शिकवणी चालकांना संघटनेची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2021 04:19 IST2021-06-28T04:19:09+5:302021-06-28T04:19:09+5:30
सांगली : लॉकडाऊनचा मोठा फटका खासगी शिकवणी चालकांना बसला आहे. जगणे मुश्कील झालेल्या शिक्षकांना संघटनेने मदतीचा हात दिला ...

अडचणीतील शिकवणी चालकांना संघटनेची मदत
सांगली : लॉकडाऊनचा मोठा फटका खासगी शिकवणी चालकांना बसला आहे. जगणे मुश्कील झालेल्या शिक्षकांना संघटनेने मदतीचा हात दिला आहे. धान्याची मदत देऊन चरितार्थासाठी हातभार लावला आहे.
संघटनेने सांगितले की, छोट्या क्लास चालकांना जगणे मुश्कील झाले आहे. मोठ्या क्लास चालकांना गुंतवणुकीच्या कर्जाचे हप्ते फेडणे शक्य झालेले नाही. विविध कर, वीज बिले, वर्गांचे फायर ऑडिट, वैद्यकीय उपचार यात ते भरडले जात आहेत. अशा संकटात कोचिंग क्लासेस टीचर्स असोसिएशन व सोशल फोरम संघटनेने सर्वच सदस्यांना गव्हाची पोती भेट दिली. पहिल्या लाटेतही संघटनेने जीवनावश्यक वस्तूंचे किट दिले होते.
संघटनेचे जिल्हाध्यक्ष गणेश जोशी यांनी मागणी केली की, शासनाने कर व बिले माफ करावीत. बंद क्लासच्या फायर ऑडिटसाठी सक्ती करू नये. क्लास चालकांना भरीव आर्थिक मदत करावी.