शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

प्रेमसंबंध मान्य नसल्याने बापानेच केला मुलीचा भोसकून खून, सांगलीतील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 3, 2023 12:15 IST

त्यानंतर वडील व तिच्या अन्य नातेवाईकांनी आत्महत्या केल्याचा बनाव केला

विटा (जि. सांगली) : प्रेमसंबंधाच्या रागातून स्वत:च्या १७ वर्षांच्या मुलीचा बापानेच चाकूने भोसकून खून केला. ही घटना शनिवारी रात्री साडेसहा वाजण्याच्या सुमारास मंगरूळ (ता. खानापूर) येथे घडली. या हल्ल्यात श्रेया संतोष जाधव (वय १७) हिचा जागीच मृत्यू झाला.याप्रकरणी हल्लेखोर वडील संतोष जगन्नाथ जाधव (वय ४५) याला पोलिसांनी अटक केली आहे.शेतकरी असलेला संताेष जाधव हा पत्नी, दाेन मुली, मुलगा यांच्यासह मंगरूळ येथे राहताे. त्याची मुलगी श्रेया ही विटा येथील एका कनिष्ठ महाविद्यालयात बारावी शास्त्र शाखेत शिक्षण घेत होती. तिचे कार्वे (ता. खानापूर) येथील एका तरुणाशी प्रेमसंबंध होते. हे प्रेमसंबंध वडील संतोष याला मान्य नव्हते. ‘त्या तरुणाशी बाेलत जाऊ नकाेस,’ असे त्याने श्रेयाला अनेकदा बजावले हाेते. तरीही श्रेया त्या तरुणाच्या संपर्कात हाेती. शनिवारी सायंकाळी श्रेया घरात स्वयंपाक करीत असताना वडील संतोष व आई तिला ‘प्रेमसंबंध ठेवू नको, तुझे अठरा वर्षे वय पूर्ण झाल्यानंतर लग्न लावून देतो,’ असे समजावून सांगत होते. मात्र, श्रेया काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हती.त्यामुळे संतापलेल्या संतोष याने श्रेयाच्या छातीवर डाव्या बाजूला भाजी कापण्याच्या चाकूने वार केला. या हल्ल्यात श्रेया गंभीर जखमी झाली. विटा येथील रुग्णालयात उपचारासाठी आणत असताना तिचा वाटेतच मृत्यू झाला. त्यानंतर वडील संतोष व तिच्या अन्य नातेवाईकांनी श्रेयाने आत्महत्या केल्याचा बनाव केला. मात्र, संशय बळावल्याने पोलिसांनी संतोष जाधव याची रविवारी कसून चौकशी केली. त्याने श्रेयाला चाकूने भोसकून ठार मारल्याची कबुली पाेलिसांसमाेर दिली.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस