धक्कादायक! वडील पैसे देत नसल्याने मुलाने वृद्ध पित्यास ट्रॅक्टरखाली चिरडून मारले
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 14:46 IST2023-05-24T14:45:12+5:302023-05-24T14:46:35+5:30
बेडग येथील शेतकरी दाजी आकळे व त्यांचा मुलगा लक्ष्मण आकळे यांच्यात गेल्या काही महिन्यापासून पैसे व जमीन नावावर करण्यावरून वाद सुरू होता.

धक्कादायक! वडील पैसे देत नसल्याने मुलाने वृद्ध पित्यास ट्रॅक्टरखाली चिरडून मारले
मिरज : बेडग ता.मिरज येथे वडील जमीन नावावर करीत नाहीत व पैसे देत नसल्याने मुलाने वृद्ध पित्यास ट्रॅक्टर खाली चिरडून ठार मारले. दाजी गजानन आकडे ( वय 70) यांच्या खूनप्रकरणी मुलगा लक्ष्मण आकळे (वय 32) याला ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे.
बेडग येथील शेतकरी दाजी आकळे व त्यांचा मुलगा लक्ष्मण आकळे यांच्यात गेल्या काही महिन्यापासून पैसे व जमीन नावावर करण्यावरून वाद सुरू होता. मुलगा लक्ष्मण वडील दाजी यांच्याकडे वारंवार पैशाची मागणी करीत होता. त्याच्या हिस्स्याची जमीन नावावर करण्यासाठीही त्याने वडिलांकडे तगादा लावला होता. मात्र त्यास पैसे देण्यास व जमीन नावावर करण्यास वडील नकार देत होते.
रागातून लक्ष्मण याने बुधवारी सकाळी रस्त्याने जात असलेल्या दाजी यांच्या अंगावरुन ट्रॅक्टर घालून त्यांना ट्रॅक्टरखाली चिरडले. यात दाजी आकळे यांचा जागीच मृत्यू झाला. याबाबत माहिती मिळताच ग्रामीण पोलिसांनी बेडग येथे जाऊन लक्ष्मण आकळे यास ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले. वडिलांच्या खून प्रकरणी लक्ष्मण याच्याविरुद्ध मिरज ग्रामीण पोलिसांत गुन्हा दाखल करुन त्यास अटक करण्यांत आली आहे.