जबलपूरमध्ये सैन्य दलाच्या गाडीला अपघात, सांगलीतील जवानाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2023 16:11 IST2023-11-08T16:11:11+5:302023-11-08T16:11:32+5:30
रांजणी : लोणारवाडी (ता.कवठेमहांकाळ) येथील भारतीय सैन्य दलातील जवान हवालदार पोपट भगवान खोत (वय ३४) यांचा जबलपूर (मध्य प्रदेश) ...

जबलपूरमध्ये सैन्य दलाच्या गाडीला अपघात, सांगलीतील जवानाचा मृत्यू
रांजणी : लोणारवाडी (ता.कवठेमहांकाळ) येथील भारतीय सैन्य दलातील जवान हवालदार पोपट भगवान खोत (वय ३४) यांचा जबलपूर (मध्य प्रदेश) येथे कर्तव्यावर असताना अपघाती मृत्यू झाला. बंगळुरूहून जबलपूर (मध्य प्रदेश) येथे जात असताना लष्कराच्या वाहनास अपघात झाला. मंगळवार, दि. ७ रोजी ही घटना घडली.
पोपट खोत हे सध्या बंगळुरू येथे कर्तव्यावर हाेते. लष्कराच्या वाहनातून ते बंगळुरूहून जबलपूरला कामानिमित्त निघाले हाेते. जबलपूरजवळ त्यांच्या वाहनास अपघात झाला. अपघातात पोपट खोत यांचा मृत्यू जागीच झाला. त्यांच्यापश्चात आई, पत्नी, दोन मुले असा परिवार आहे. त्यांचे पार्थिव आज-बुधवारी लोणारवाडी येथे आणण्यात येणार आहे. यानंतर, दुपारी १२ वाजता लष्करी इतमामात त्यांच्यावर अंत्यविधी करण्यात येणार आहेत.