नवेखेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:24 AM2021-01-17T04:24:00+5:302021-01-17T04:24:00+5:30

बोरगाव : नवेखेड (ता. वाळवा) येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्याने गावात उत्साहाचे वातवरण आहे. या अरोग्य केंद्रामुळे ...

Approved Primary Health Center at Navekhed | नवेखेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर

नवेखेड येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर

googlenewsNext

बोरगाव : नवेखेड (ता. वाळवा) येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्याने गावात उत्साहाचे वातवरण आहे. या अरोग्य केंद्रामुळे गावाच्या वैभवात भर पडल्याचे मत सरपंच प्रदीप चव्हाण यांनी व्यक्त केले.

ते म्हणाले, यापूर्वी गोरगरीब रुग्णांना बोरगाव किंवा वाळवा येथे आरोग्य सेवेसाठी धाव घ्यावी लागत होती. यामुळे गावात आरोग्य केंद्राची मागणी होत होती. याची दखल घेत ग्रामपंचायतीने पाठपुरावा केला. पालकमंत्री जयंत पाटील व प्रा डाॅ. सुषमा नायकवडी यांनी शासन दरबारी रेटा लावून वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्रास ग्रामीण रुग्णालयाचा दर्जा दिला व वाळवा येथील प्राथमिक आरोग्य केंद्र नवेखेडला मंजूर करून गावकऱ्यांची मागणी पूर्ण केली.

या आरोग्य केंद्रामुळे बोरगाव आरोग्य केंद्रीवरील येणारा तान ही कमी होणार आहे व जवळच्या जुनेखेड, मसुचीवाडी, डुकेवाडी, चांदोली वसाहत यांनाही याचा फायदा होणार आहे.

कोरोनाकाळात जनतेत आरोग्याविषयी जागृती झाली आहे. रुग्णांसाठी कायमस्वरूपी आरोग्याचीही सुविधा होणार आहे. त्याचा चांगला फायदा येथील ग्रामस्थांना होणार यात शंका नाही.

कोट

नवेखेड येथे होणारे प्राथमिक आरोग्य केंद्र आदर्शवतपणे चालवले जाईल. या परिसरातील लोकांची मोठी सोय यानिमिताने होईल.

- प्रदीप चव्हाण, सरपंच, नवेखेड

Web Title: Approved Primary Health Center at Navekhed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.