आंबेडकर जयंती साधेपणाने घरातच साजरी करण्याचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 10:56 AM2021-04-13T10:56:19+5:302021-04-13T11:08:53+5:30

Dr Babasaheb Ambedkar Jayanti sangli : सालाबादप्रमाणे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती आपण साजरी मोठ्या साजरी होते. पण जगभर आपल्या भारत देशात कोरोना रोगाने थैमान घातले असुन कित्येक लोक मुत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे देशभर संचारबंदी घोषित करण्यात आली असून, नागरिकांनी घराबाहेर न पडता सर्वानी मोठ्या उत्साहात घरीच जंयती साजरी करून प्रशासनास सहकार्य करावे,  असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 

Appeal to celebrate Ambedkar Jayanti at home with simplicity | आंबेडकर जयंती साधेपणाने घरातच साजरी करण्याचे आवाहन

सांगलीत डाँ.बाबासाहेब आंबेडकर याच्या पुतळ्यावर विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. (छाया :  सुरेंद्र दुपटे) .

googlenewsNext
ठळक मुद्देआंबेडकर जयंती साधेपणाने घरातच साजरी करण्याचे आवाहनडॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने आवाहन

संजयनगर/सांगलीं  : सालाबादप्रमाणे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले यांची जयंती आपण साजरी मोठ्या साजरी होते. पण जगभर आपल्या भारत देशात कोरोना रोगाने थैमान घातले असुन कित्येक लोक मुत्यूमुखी पडत आहेत. त्यामुळे देशभर संचारबंदी घोषित करण्यात आली असून, नागरिकांनी घराबाहेर न पडता सर्वानी मोठ्या उत्साहात घरीच जंयती साजरी करून प्रशासनास सहकार्य करावे,  असे आवाहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या वतीने करण्यात आले आहे. 


कोणीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीला १४ एप्रिलला बाहेर पडू नये. ठरल्या प्रमाणे  सकाळी १०.३० वाजता आपल्या घरीच प्रतिमेचे पुजन करून सांयकळी घरात, गॅलरीत, ओट्यावर, दरवाजात मेणबत्ती, दिवे लावून बोधिसत्व डाँ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करुन बौध्द वंदना घ्यावी, आणि ह्या संकटात विश्वाला कोरोनाशी लढण्यास अधिक बळ मिळावे अशी प्रार्थना करावी.

कोरोना हटवण्यासाठी शासनाच्या निर्देशाचे पालन करायचेच आहे. आंबेडकरी जनतेने गर्दी करून कोणत्याही कटकारस्थानास बळी पडू नये, काही ठराविक लोकांची चुकी संपूर्ण समाजास कारणीभुत होवून जाईल.. यावेळी महात्मा ज्योतीबा फुले जयंती महोत्सवास सांगलीत सुरुवात करण्यात आली आहे.

१४  रोजी डॉ. बाबासाहेब आबेंडकर यांच्या पुतळ्याजवळ कोणीही जाऊन गर्दी होईल असे कृत्य करू नका. आपले संपुर्ण कुटुंब घरातच जमवुन भगवान बुध्द व डाँ.आंबेडकर यांचे प्रतीमा पुजन करुन मेणबत्ती दिपधुप- पेटवून वंदना घ्यावी, असे समितीतर्फे आवाहन केले आहे 

 

Web Title: Appeal to celebrate Ambedkar Jayanti at home with simplicity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.