शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

माफी मागा, अन्यथा घरातून बाहेर पडू देणार नाही; गोपीचंद पडळकरांना आंदोलकांचा इशारा, इस्लामपुरात तीव्र निषेध

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 20, 2025 15:32 IST

’राष्ट्रवादी’कडून पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून आंदोलन

इस्लामपूर : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांचा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर शुक्रवारी तीव्र शब्दात जाहीर निषेध करण्यात आला. यावेळी सर्वच वक्त्यांनी पडळकर यांनी जाहीर माफी मागावी, नाही तर घरातून बाहेर पडू देणार नाही, असा इशारा दिला. या मोर्चावेळी घोषणाबाजी करत कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी संताप व्यक्त केला.यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष विजयराव पाटील, महिला अध्यक्ष सुनीता देशमाने, शहराध्यक्ष शहाजी पाटील, प्रा. शामराव पाटील, विजयराव यादव, माणिकराव पाटील, शशिकांत पाटील, अशोक पाटील, दादासाहेब पाटील, अरुण कांबळे, संग्राम जाधव, पुष्पलता खरात, विश्वजित पाटील उपस्थित होते. आमदार जयंत पाटील व लोकनेते राजारामबापू पाटील व कुसुमताई पाटील यांच्यावरील वक्तव्याचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी खरपूस समाचार घेतला. पडळकर यांच्या प्रतिमेला जोडे मारून निषेध करण्यात आला.संजय पाटील म्हणाले, ‘आ. पाटील यांचे राजकारणात तुझ्या वयापेक्षा अधिक वर्षांचे काम आहे. त्यामुळे आता जयंत पाटील यांच्यावरील टीका खपवून घेणार नाही. ज्यांच्याकडे गृहखाते आहे त्यांनी या प्रवृत्तीला आवर घालावा. अन्यथा वाईट परिणाम होतील.’झुंझारराव पाटील म्हणाले, ‘अशी बेताल वक्तव्य करणाऱ्याना आवर घालावा. अन्यथा प्रशासनाला अवघड जाईल.’ संभाजी कचरे म्हणाले, ‘आता राजकारणात आला आहे. शिक्षकांचा मुलगा म्हणतो पण हा शिक्षकांचा नसावा. या माणसामुळे धनगर समाजाची हानी झाली आहे. त्याने आमदार जयंत पाटील यांची माफी मागावी.’सुनीता देशमाने म्हणाल्या, ‘वाळवा तालुक्यातील महिला घरात येऊन बांगड्या भरल्याशिवाय राहणार नाहीत.’ शहाजी पाटील म्हणाले, ‘स्वतःच्या गावात, आटपाडी तालुक्यात किंमत नाही. समाजातून किंमत संपली आहे. त्यांची किंमत बिरोबाने संपवली आहे. पडळकर यांनी माफी मागावी. नाही तर हे आंदोलन असेल चालू राहणार आहे. यावेळी अरुणादेवी पाटील, विशाल माने, पुष्पलता खरात, सुनील मलगुंडे, अशोक वाटेगावकर, भगवान पाटील, आनंदराव मलगुंडे, शंकरराव चव्हाण, शिवाजी चोरमुले, शैलेश पाटील, धैर्यशील पाटील, लालासाहेब अनुसे, माणिक शेळके, शिवाजी वाटेगावकर, अर्जुन माने, रोझा किणीकर, खंडेराव जाधव, छाया पाटील, डॉ. योजना शिंदे यांनी पडळकर यांचा निषेध केला.वाचाळवीराच्या गळ्यात पट्टा घालावाविजयराव पाटील म्हणाले, ‘आमदार पडळकर यांची लायकी नसताना ते टीका करत आहेत. मुख्यमंत्र्यांनी असल्या वाचाळवीराच्या गळ्यात पट्टा घालावा. वाळवा तालुका पेटून उठल्यावर प्रशासनाला आवरता येणार नाही. जयंत पाटील यांच्यावर टीका करून प्रशासनाचे लक्ष विचलित करण्याचे काम केले जात आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांनी पडळकर यांचा राजीनामा घ्यावा.’