आष्टा भाजी मंडईतील व्यापाऱ्यांची अँटिजन टेस्ट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:19 IST2021-06-26T04:19:32+5:302021-06-26T04:19:32+5:30
आष्टा येथे भाजी मंडईमधील सर्व व्यापाऱ्यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. या वेळी डॉ. संतोष निगडी, डॉ. कैलास चव्हाण, डॉ. ...

आष्टा भाजी मंडईतील व्यापाऱ्यांची अँटिजन टेस्ट
आष्टा येथे भाजी मंडईमधील सर्व व्यापाऱ्यांची अँटिजन टेस्ट करण्यात आली. या वेळी डॉ. संतोष निगडी, डॉ. कैलास चव्हाण, डॉ. बी.बी. कांबळे, आसावरी सुतार, आर.एन. कांबळे उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : आष्टा ग्रामीण रुग्णालय व आष्टा नगर परिषदेच्या वतीने शहरातील काकासाहेब शिंदे भाजी मंडईमधील सर्व भाजी व्यापाऱ्यांची अँटिजन टेस्ट घेण्यात आली.
आष्टा शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर विविध ठिकाणी भाजीबाजार सुरू आहे, मात्र या भाजी विक्री करणाऱ्या महिला व पुरुषांची कोरोना टेस्ट करणे गरजेचे बनले होते. शहरातील भाजी मंडईमधील सर्व व्यापाऱ्यांची कोरोना टेस्ट करण्यात आली. अँटिजन टेस्टिंगला विक्रेत्यांनी चांगला प्रतिसाद दिला. या वेळी ग्रामीण रुग्णालयाचे डॉ. संतोष निगडी, डॉ. कैलास चव्हाण, बी.बी. कांबळे, आर.एन. कांबळे, आसावरी सुतार यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.