शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

अनिकेत कोथळे खून खटला:..म्हणून कोठडीत अमानुष मारहाण करण्यात आली, पोलीस निरीक्षकांची साक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 16:13 IST

सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ६ नोव्हेंबर २०१७ रोजी अनिकेत कोथळे याचा मारहाणीत मृत्यू झाला होता.

सांगली : सांगली शहर पोलीस ठाण्याकडे नोंद असलेल्या गुन्ह्यात अनिकेत कोथळे व अमोल भंडारे संशयित होते. हा गुन्हा कबूल करावा म्हणून त्यांना कोठडीत अमानुष मारहाण करण्यात आली. यात अनिकेतचा मृत्यू झाल्याचे शहर पोलीस ठाण्यात त्यावेळी कार्यरत असलेल्या अंमलदाराने सांगितल्याची साक्ष तत्कालीन पोलीस निरीक्षक राजन माने यांनी दिली.सांगली शहर पोलीस ठाण्याच्या कोठडीत ६ नोव्हेंबर २०१७ रोजी अनिकेत कोथळे याचा मारहाणीत मृत्यू झाला होता.  जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. मलाबादे यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी सुरु आहे. मंगळवारी तत्कालीन गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक राजन माने यांची साक्ष सुरू झाली. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी घेतलेल्या सरतपासावेळी माने यांची साक्ष नोंदविण्यात आली.अनिकेत कोथळे आणि अमोल भंडारे पळून गेल्याची देण्यात आलेली फिर्याद खोटी असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार अमोल भंडारे व शहर पोलीस ठाण्यात हजर असलेल्या अंमलदारांकडे चौकशी केल्यानंतर अनिकेत व अमोल पळून गेले नसून गुन्हा कबूल करण्यासाठी दोघांना मारहाण केली व त्यात अनिकेतचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह आंबोली येथील महादेवगड येथे नेऊन जाळल्याचे निष्पन्न झाले, असे त्यांनी सांगितले.उलट तपासादरम्यान साक्षीदारांना विचारलेल्या प्रश्नावरून सरकारी पक्ष व बचाव पक्षात युक्तिवाद रंगला. या खटल्याची पुढील सुनावणी आता १९ ते २१ डिसेंबर या कालावधीत होणार आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीPoliceपोलिस