शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शिक्षक नसल्याने मिरजेत संतप्त पालकांनी शाळेला ठोकले टाळे, विद्यार्थी रस्त्यावर 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 20, 2025 18:37 IST

महापालिका आयुक्त, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष

मिरज : मिरजेत इंदिरानगर येथील महापालिकेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांना रस्त्यावर बसायची वेळ आली आहे. १३५ विद्यार्थी असलेल्या शाळेत एकच शिक्षक असल्याने संतप्त पालकांनी शिक्षकाच्या मागणीसाठी शाळेला टाळे ठोकून आंदोलन केले.महापालिका शाळा क्रमांक २२ मध्ये पहिले ते सातवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना एकच शिक्षक शिकवत आहेत. शाळेमध्ये शिपायाची नेमणूक नसल्याने शिक्षकच शाळेची साफसफाई करीत आहेत. नवीन शैक्षणिक वर्षातही या शाळेत विद्यार्थ्यांना शिक्षक मिळाला नसल्याने पालकांनी व मुलांनी शाळेबाहेर बसून आंदोलन केले.महापालिका आयुक्त, शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष आहे. पालकांनी शाळेत आणखी शिक्षक नेमण्याची लेखी मागणी शिक्षण विभागाकडे वारंवार केली आहे. मात्र, या मागणीची महापालिकेने दखल घेतलेली नाही. इंदिरानगर मागासवर्गीय वसाहतीतील ही महापालिकेची एकमेव शाळा असून आमच्या मुलांनी शिक्षण घ्यायचे की नाही, असा प्रश्न संतप्त पालकांनी केला.शेकडो विद्यार्थ्यांनी रस्त्यावर बसून आंदोलन केले. शाळेचे व्यवस्थापन अत्यंत नित्कृष्ट दर्जाचे असून शाळेत स्वच्छतागृहांची अवस्था दयनीय आहे. या शाळेत किमान पाच शिक्षकांची गरज असून शिक्षकाअभावी विद्यार्थ्यांचे भविष्य अंधारात असल्याचे चित्र आहे. विद्यार्थी व पालकांच्या आंदोलनामुळे महापालिका शिक्षण मंडळाचे अधिकारी तेथे आले.

विद्यार्थी बहुसंख्य पण, शिक्षक नाहीतशाळेत आणखी शिक्षक नियुक्तीचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. महापालिकेच्या अनेक शाळांत शिक्षक आहेत, परंतु विद्यार्थी नाहीत. मात्र या शाळेत विद्यार्थी बहुसंख्य असताना शिक्षक नसल्याचे चित्र आहे.