शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन हजार महिला सेवा सहकारी संस्थांना सरकारी कामे देणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा
2
अनिल अंबानी सीबीआयच्या रडारवर; मुंबईतील घरी छापे, ३,०७३ कोटींचे कथित कर्ज घोटाळा प्रकरण
3
काँग्रेसच्या गॅम्बलर आमदाराला अटक; १२ कोटींची राेकड जप्त
4
निवडणूक लढवायची? मग मतदारयाद्या तपासायला घ्या, राज ठाकरे यांची इच्छुकांना सूचना
5
अमेरिकेत ५.५ कोटी व्हिसाधारकांची चौकशी; ५० लाख भारतीयांचाही समावेश, आता ट्रक चालकांनाही व्हिसा नाही
6
"वर्ष अखेरीस मेड इन इंडिया सेमीकंडक्टर बाजारात येणार, तसेच ६ जी..."; PM नरेंद्र मोदींची घोषणा
7
आजचे राशीभविष्य, २४ ऑगस्ट २०२५: दैनंदिन कामे निर्विघ्नपणे पार पडतील; संसारात समाधान राहील
8
"मी मांसाहार खाल्लेलं माझ्या पांडुरंगाला चालतं, तुम्हाला काय प्रॉब्लेम..?"; सुप्रिया सुळेंच्या विधानानं नवा वाद
9
वन नेशन, वन इलेक्शन...! भाजपानं रणनीतीत केला बदल; विरोधकांना शह देण्यासाठी नवा 'मेगा प्लॅन'
10
दीड वर्षाच्या मुलाला मिठीत घेऊन BSF जवानानं मारली गंगा नदीत उडी; कारण ऐकून डोळ्यात पाणी येईल
11
अमेरिकन नागरिकांना १३० कोटींना गंडा घातला, ईडीने बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश केला; ८ आलिशान कार जप्त
12
सुरतमधून आणलं अन् मुंबईत हत्या; ट्रेनच्या टॉयलेटमध्ये सापडलेल्या पाच वर्षाच्या मुलाला मावशीच्या मुलानेच...
13
रोनाल्डोनं रचला नवा इतिहास! अशी कामगिरी करणारा फुटबॉल जगतातील ठरला पहिला खेळाडू
14
लग्नस्थळ पाहायला गेलेल्या पित्यासह दोघांचा बुडून मृत्यू; पिंपळनेरजवळ अपघात, कार कॅनॉलमध्ये उलटली
15
Video: थैलीत नवजात बाळाचा मृतदेह; बाप जिल्हाधिकाऱ्यांसमोर ढसा ढसा रडला; म्हणाला, 'डॉक्टरांनी...'
16
"बंद दाराआड जे घडलं ते...." श्रेयस अय्यरसंदर्भात एबी डिव्हिलियर्सनं मांडलं रोखठोक मत
17
भोग भोगावे लागतील, शेतकऱ्यांनी नुकसानीची सवय करून घ्यावी; भाजपा नेते पाशा पटेलांचा अजब सल्ला
18
पतीने केली मृत्यूची भविष्यवाणी, पत्नीनं खरी करून दाखवली; साडीच्या पदरानं गळा दाबून मारलं, मग...
19
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
20
आधी बेदम मारहाण केली, मग बेशुद्ध पडल्यानंतर जिवंत जाळली; निक्कीच्या मृत्यूनंतर बहिणीचा आक्रोश

Shaktipeeth Highway: अंकलीमध्ये संतप्त शेतकऱ्यांनी महामार्ग रोखला, खासदार विशाल पाटलांनी दिला निर्वाणीचा इशारा, म्हणाले..

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 2, 2025 18:22 IST

शासनाविरोधात जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला

सांगली : शक्तिपीठ महामार्ग रद्दच्या मागणीसाठी शेतकऱ्यांनी कुटुंबीयासह नागपूर-रत्नागिरी महामार्ग मंगळवारी सकाळी अंकली (ता. मिरज) येथे रोखला. तासभर शेतकऱ्यांनी रास्ता रोको केल्यामुळे वाहतूक कोंडी झाली होती. शासनाविरोधात जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. आंदोलकांना रोखण्यासाठी मोठा पोलिस बंदोबस्त तैनात केला होता.खासदार विशाल पाटील, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष महेश खराडे, सर्व पक्षीय कृती समितीचे सतीश साखळकर यांच्या नेतृत्वाखाली हजारो शेतकरी, महिला, मुलांसह आंदोलनात उतरले होते. भर पावसात महिलांसह शेतकऱ्यांनी रस्त्यावर ठिय्या मारला होता. कोल्हापूर जिल्ह्याप्रमाणेच जोरदार विरोध सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांचाही आहे हे रास्ता रोकोच्या माध्यमातून दाखवून दिला. रस्त्याच्या दुतर्फा पाच ते सहा किलोमीटरच्या वाहनाच्या रांगा लागल्या होत्या. विशेष म्हणजे एक रुग्णवाहिका आल्यानंतर आंदोलकांनी रस्ता मोकळा करून दिला."शेती आमच्या हक्काची नाही, नाही कुणाच्या बापाची", "या सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय" अशा घोषणा देत शेतकऱ्यांनी अंकली फाटा परिसर दणाणून सोडला होता. यावेळी प्रभाकर तोडकर, प्रवीण पाटील, उमेश एडके, लता कांबळे, बाळासाहेब पाटील आदींनी मनोगत व्यक्त केले. आंदोलनात यशवंत हारूगडे, रघुनाथ पाटील, अधिक पाटील, विष्णू पाटील, भरत चौगुले, श्रीधर उदगावे, अनिल माळी, अरुण पाटील, एकनाथ कोळी, बाळासाहेब लिंबेकाई, सुधाकर पाटील, रावसाहेब पाटील, अरुण कवठेकर, संतोष आंबी आदी उपस्थित होते.

महेश खराडेसह आठ जणांना अटकआंदोलनामधील प्रमुख महेश खराडे यांच्यासह भरत चौगुले, श्रीधर उदगावे, उमेश एडके, भूषण गुरव, प्रदीप माने, महावीर चौगुले, शांतीनाथ लिंबेकाई आदी आंदोलकांना पोलिसांनी अटक केली. त्यानंतर या आंदोलकांना पोलिसांनी सोडून दिले.

टक्केवारी लाटण्यासाठीच शक्तिपीठ महामार्गाचा घाट : विशाल पाटीलआम्ही विकासाच्या विरोधात नाही. मात्र, या महामार्गांवर अनेक ठिकाणी मोठे पूल होत आहेत. त्यामुळे याचा अभ्यास करण्याची गरज आहे. किती भराव टाकला जाणार असून, महापूर काळात किती पाणी येईल, त्याचा किती शहरे आणि किती गावांना फटका बसणार आहे. या सर्व बाबींचा विचार सरकारने करण्याची गरज आहे. शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करून टक्केवारी लाटण्यासाठीच शक्तिपीठ महामार्गाचा घाट घातला जात आहे. तो रद्दच झाला पाहिजे. कोणत्याही परिस्थितीत महामार्ग रद्द करण्यासाठी प्रसंगी रक्त सांडावे लागले तरी बेहत्तर, असा निर्वाणीचा इशारा खासदार विशाल पाटील यांनी दिला.

आमदार, खासदारांना जगवण्यासाठीच 'शक्तिपीठ' : महेश खराडेस्वाभिमानी पक्षाचे अध्यक्ष महेश खराडे म्हणाले, कृषी दिनादिवशीच शेतकऱ्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावे लागत आहे, ही शोकांतिका आहे. वर्धा ते गोवा येथील शेतकऱ्यांची शक्तिपीठ महामार्गाची मागणी नाही. या महामार्गासाठी शासन २० हजार कोटीचे कर्ज काढणार आहे. त्यामुळे राज्य आणखी कर्जबाजारी होणार आहे. शेतकऱ्यांचा विरोध असतानाही तो डावलून पोलिसी बळाचा वापर करून मोजणी प्रक्रिया सुरू आहे. हा अट्टाहास कशासाठी सुरू आहे. ठेकेदार, आमदार, खासदार जगविण्यासाठी सुरू आहे हे स्पष्ट होते, असा आरोपही त्यांनी केला.