सांगली : गॅस दरवाढीच्या प्रश्नावर सांगलीत राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्यावतीने मंगळवारी ''चूल पेटवा'' आंदोलन करुन संताप व्यक्त करण्यात आला. केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.जिल्हा परिषदेसमोरील राष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले. महिला आघाडीच्यावतीने याठिकाणी चूल पेटवून त्यावर भाकऱ्या करण्यात आल्या. चुलीवरच्या भाकऱ्या वाटून केंद्र शासनाच्या गॅस दरवाढीवरोधात निदर्शने केली. यावेळी विनया पाठक म्हणाल्या की, केंद्र सरकारने घरगुती गॅस सिलिंडरवर अन्यायकारक भाववाढ करून सामान्य गृहिणीचे कंबरडे मोडले. सामान्य लोकांबद्दल या सरकारला काहीही कळवळा नाही. केंद्र सरकारने तातडीने ही दरवाढ मागे घ्यावी.यावेळी केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी व निषेध करण्यात आला. राष्ट्रवादी महिला आघाडीच्या शहर जिल्हाध्यक्षा विनया पाठक यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी ज्योती आदाटे, डॉ. छाया जाधव, अनिता पांगम, वंदना चंदनशिवे, आशा पाटील, जसबीर कौर खंगुरा, जयश्री भोसले, प्रियांका तुपलोंडे, सुनिता लालवानी, जयश्री चौगुले, संध्या आवळे, संगीता मासाळ, अर्चना भोई, सुरेखा मासाळ, संगीता मोठे, वैशाली कांबळे आदी उपस्थित होत्या.केंद्र शासनाचा निषेध''महंगाई से मच गया हाहा:कार, अब नही चाहिये मोदी सरकार'', ''भाजप सरकार होश में आओ, जनता से तुम ना टकराओ'' अशा घोषणा देत महिला आंदोलकांनी केंद्र सरकारचा निषेध केला.
गॅस दरवाढीबद्दल संताप : केंद्र सरकारचा निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2020 13:57 IST
NCP Sangli- गॅस दरवाढीच्या प्रश्नावर सांगलीत राष्ट्रवादीच्या महिला आघाडीच्यावतीने मंगळवारी ''चूल पेटवा'' आंदोलन करुन संताप व्यक्त करण्यात आला. केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने करण्यात आली.
गॅस दरवाढीबद्दल संताप : केंद्र सरकारचा निषेध
ठळक मुद्देमहिला आंदोलकांनी केला केंद्र सरकारचा निषेधराष्ट्रवादीच्या जिल्हा कार्यालयासमोर निदर्शने