शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

जतमध्ये कर्नाटक सीमेवर अज्ञाताचा खून, पोत्यात भरून मृतदेह रस्त्याकडेला टाकला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 15:58 IST

आरोपीची नवी शक्कल

उमदी : महाराष्ट्र व कर्नाटक सीमेवर जिगजेवणी (ता. चडचण) येथील कल्याळ वस्तीवर एका अनोळखीच्या खुनाचा प्रकार समाेर आला आहे. ३५ ते ४० वयाच्या व्यक्तीचा खून करुन मृतदेहाचे चार तुकडे करून, पोत्यात घालून रस्त्याकडेला टाकण्यात आले आहेत.मृत व्यक्ती महाराष्ट्रातील असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. महाराष्ट्र व कर्नाटकपोलिस मृत व्यक्तीची ओळख पटविण्याचा प्रयत्न करीत आहेत. जत तालुक्यातील सुसलाद गावास लागून असलेल्या कर्नाटकातील जिगजेवणी येथे हा प्रकार घडला आहे. हल्लेखाेरांनी अत्यंत क्रूरपणे हा खून केला असून, पोलिसांना चकवा देण्याचा प्रयत्नही केला आहे. कर्नाटक व महाराष्ट्र सीमेवर मृतदेह टाकल्याने पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत. मात्र महाराष्ट्र व कर्नाटक पोलिसांनी समन्वयाने तपास सुरु केला आहे. लवकरच आरोपीचा शोध घेऊन आरोपीला बेड्या ठोकू, असे पोलिसांनी सांगितले.

आरोपीची नवी शक्कलकर्नाटकात खून करायचा आणि मृतदेह महाराष्ट्रात आणून टाकायचा तसेच महाराष्ट्रात खून करायचा अन् कर्नाटक सीमाभागात मृतदेह टाकायचे असा प्रकार गेल्या काही वर्षांत सुरु झाला आहे. आज पुन्हा हा प्रकार हल्लेखाेरांनी अवलंबला आहे. पोलिसांना चकवा देण्यासाठी आरोपीची शक्कल असल्याचे दिसते आहे.

टॅग्स :SangliसांगलीCrime Newsगुन्हेगारीKarnatakकर्नाटकPoliceपोलिस