जत : उमदी ते विजयपूर राष्ट्रीय महामार्गावरील बोर्गी खुर्द (ता. जत) हद्दीत २१ लाखांचे बेकायदेशीर बायोडिझेलचा साठा उमदी पोलिसांनी जप्त केला. सुमारे १९ हजार लिटर बायोडिझेल किंमत अंदाजे १३ लाख रुपये तसेच इतर साहित्य असे सुमारे सात लाख असा एकूण २१ लाख ४७ हजार ३१० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.याप्रकरणी एका संशयितास पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. कर्नाटक राज्यातून बेकायदेशीररीत्या बायोडिझेलची वाहतूक करून बोर्गी खुर्द येथील शेतजमिनीत लोखंडी टाक्यांमध्ये साठा केला जात होता. तेथून अवैधरीत्या विक्री सुरू होती. याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी छापा मारून चौकशी केली असता हा प्रकार उघडकीस आला.जागामालक मलक्काण्णा रेवाप्पा कुंबार (४२, रा. तम्बक दोडडी, होर्ती, जि. विजयपूर, राज्य कर्नाटक), त्याचे मालक रवी लोणी (रा. उमदी, ता. जत, जि. सांगली) व संगाप्पा होर्तीकर (रा. होर्ती, जि. विजयपूर, राज्य कर्नाटक) यांच्या विरुद्ध उमदी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सहायक पोलिस निरीक्षक संदीप कांबळे आणि जतचे पुरवठा अधिकारी श्रीकांत चोथे यांच्या पथकाने साठा जप्त करून पंचनामा केला. पोलिस ठाण्यात पोलिस हवालदार आगतराव मासाळ यांनी फिर्याद दिली. या कारवाईत पोलिस उपनिरीक्षक कुलकर्णी, सिद्धेश्वर गायकवाड, पोलिस हवालदार आगतराव मासाळ, आप्पासाहेब हाक्के, संतोष माने, नारायण तोडकर, संतोष चव्हाण, सुदर्शन खोत आणि आप्पा घोडके यांचा सहभाग होता. या प्रकरणी एका कामगारास चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे.
Web Summary : Police seized ₹21 lakh worth of illegal biodiesel in Borgi Khurd, Jath taluka. Approximately 19,000 liters of biodiesel were confiscated. Police detained one suspect and booked three individuals for illegal storage and sales. Further investigation is underway.
Web Summary : जत तालुका के बोर्गी खुर्द में पुलिस ने ₹21 लाख का अवैध बायोडीजल जब्त किया। लगभग 19,000 लीटर बायोडीजल जब्त किया गया। पुलिस ने एक संदिग्ध को हिरासत में लिया और अवैध भंडारण और बिक्री के लिए तीन लोगों के खिलाफ मामला दर्ज किया। आगे की जांच जारी है।