अमृता सूर्यवंशी यांनी जिंकली जायन्ट्स क्वीन स्पर्धा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 20, 2021 03:51 PM2021-03-20T15:51:46+5:302021-03-20T15:53:15+5:30

Women's Day Special Sangli- हरिपुरात जायन्ट्स ग्रुप ऑफ प्रेरणा सहेलीकडून महिला दिनानिमित घेण्यात आलेल्या जायन्ट्स क्वीन स्पर्धेत अमृता सूर्यवंशी यांनी जायन्ट्स क्वीनचा बहुमान पटकावला. यावेळी सुनीता खंडागळे, अश्विनी गुरव, प्रीती कदम, अंगवा कस्तुरे, सुनीता शेरीकर यांनी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

Amrita Suryavanshi wins Giants Queen competition | अमृता सूर्यवंशी यांनी जिंकली जायन्ट्स क्वीन स्पर्धा

अमृता सूर्यवंशी यांनी जिंकली जायन्ट्स क्वीन स्पर्धा

Next
ठळक मुद्देअमृता सूर्यवंशी यांनी जिंकली जायन्ट्स क्वीन स्पर्धा हरिपुरात जायन्ट्स ग्रुप ऑफ प्रेरणा सहेलीकडून महिलांचे सत्कार

संजयनगर/सांगली : हरिपुरात जायन्ट्स ग्रुप ऑफ प्रेरणा सहेलीकडून महिला दिनानिमित घेण्यात आलेल्या जायन्ट्स क्वीन स्पर्धेत अमृता सूर्यवंशी यांनी जायन्ट्स क्वीनचा बहुमान पटकावला. यावेळी सुनीता खंडागळे, अश्विनी गुरव, प्रीती कदम, अंगवा कस्तुरे, सुनीता शेरीकर यांनी कर्तृत्ववान महिलांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

काँग्रेसच्या नेत्या शैलजा प्रकाश पाटील आणि पूजा विशाल पाटील यांची या कार्यक्रमांना उपस्थिती होती. जायन्ट्स ग्रुप ऑफ प्रेरणा सहेलीच्या अध्यक्षा अमृता खोत आणि सुनीता शेरीकर, सचिव प्रिया मगदूम यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

महिला दिनानिमित्त हरिपूर येथील जायन्ट्स ग्रुप ऑफ प्रेरणा सहेलीकडून प्रत्येक वर्षी विविध कार्यक्रम घेतले जातात. ग्रुपच्या जेष्ठ मेंबर सुनीता शेरीकर यांनी यामध्ये सातत्य ठेवले आहे. महिला दिनानिमित्त झालेल्या कार्यक्रमास अरविंद तांबवेकर, उपसरपंच परशुराम शेरीकर, माजी नगरसेविका शालन चव्हाण, प्रवीण खोत, युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुहेल बलबंड, अमित उजगिरे, मारुती शेरीकर, राजश्री तांबवेकर आदी उपस्थित होते.

या वेळी महिला दिनी घेण्यात आलेल्या पाककला स्पर्धा, तसेच विविध स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी घेण्यात आलेल्या जायन्ट्स क्वीन स्पर्धेत अनेक महिलांनी सहभाग घेत आपल्या कलांचे सादरीकरण केले. यामध्ये तीन स्पर्धकांना विजेते घोषित करून त्यांना जायन्ट्स क्वीन म्हणून सन्मानित करण्यात आले.

 परीक्षक म्हणून जायन्ट्स ग्रुप ऑफ आकांशा सहेलीच्या अध्यक्षा उमा जाधव, सदस्य प्रा.अर्चना सूर्यवंशी यांनी काम पाहिले. या कार्यक्रमासाठी हरमित कौर, बिना पाटील, वैशाली माने, दीपा बोंद्रे , शोभा चव्हाण, माधुरी बोन्द्रे, गीता खोकडे, वैशाली हनबर, मालुताई बोन्द्रे, सुचेता काटकर, संगीता तांदळे आदी उपस्थित होत्या. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अश्विनी गोरे यांनी केले.

Web Title: Amrita Suryavanshi wins Giants Queen competition

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.