शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

अमृत भारत योजना: कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह १६ रेल्वेस्थानके विकसित होणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 3, 2023 16:11 IST

मिरज जंक्शन या महत्त्वाच्या स्थानकाचा समावेश नाही. कारण...

मिरज : मध्य रेल्वेच्या पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, साताऱ्यासह १६ रेल्वेस्थानक अमृत भारत योजनेअंतर्गत विकसित करण्यात येणार आहेत. यासाठी रेल्वेने प्रवासी व प्रवासी संघटनांकडून सूचना मागविल्या आहेत.रेल्वे मंत्रालयाने अमृत भारत स्थानक योजनेंतर्गत देशात सुमारे १२०० स्थानकांच्या सुधारणांचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. मध्य रेल्वेने याअंतर्गत ७६ स्थानकांवर प्रवासी सुविधांसाठी सुधारणाचे नियोजन केले आहे. या स्थानकात आवश्यकतेनुसार अतिरिक्त पादचारी पूल, लिफ्ट व एस्केलेटर, रहदारी मजल्याची सुधारणा, प्रतीक्षागृह व शाैचालयांची सुधारणा, स्थानकाच्या दर्शनी भागाची सुधारणा, स्थानकांत प्रकाश व्यवस्था सुधारणा, विविध चिन्हे, रेल्वे इंडिकेटर बोर्ड व कोच इंडिकेटर बसविण्यात येणार आहेत.स्थानकाच्या वाहन पार्किंगमध्ये सुधारणा, प्लॅटफॉर्मवरील शेडचा विस्तार, यासह प्रवासी सुविधा देणे हा उद्देश आहे. अमृत भारत योजनेत पुणे विभागातील कोल्हापूर, सांगली, कऱ्हाड, हातकणंगले, सातारा, वाठार, फलटण, तळेगाव, आकुर्डी, हडपसर, चिंचवड, बारामती, देहू रोड, केडगाव, उरळी, लोणंद ही स्थानके समाविष्ट आहेत. या स्थानकांवर आवश्यक सुविधांसाठी प्रवाशांनी दि. १५ ऑगस्टपर्यंत सूचना देण्याचे आवाहन रेल्वे प्रशासनाने केले आहे.प्रवासी, प्रवासी संघटना, तसेच रेल्वेच्या विविध सेवा प्रदात्यांकडून स्थानकात आवश्यकतांबद्दल समावेशक दृष्टिकोन असलेल्या सूचनांचाही विचार करण्यात येणार आहे.

मिरज स्वतंत्रपणे विकसित हाेणारअमृत भारत योजनेत मिरज जंक्शन या महत्त्वाच्या स्थानकाचा समावेश नाही. मिरज माॅडेल स्थानक म्हणून घोषित झाले आहे. यामुळे पुणे-मिरज रेल्वेमार्गाचे दुहेरीकरण पूर्ण झाल्यानंतर मिरज स्थानक स्वतंत्रपणे विकसित करण्यात येणार आहे.

टॅग्स :Sangliसांगलीkolhapurकोल्हापूरSatara areaसातारा परिसरrailwayरेल्वे