शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: भारत पाकिस्तानमध्ये तणावाचे वातावरण असतानाच बेळुंखी येथे सापडला ड्रोन, उडाली खळबळ 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2025 19:11 IST

डफळापूर : बेळुंखी (ता.जत) येथे रात्रीच्या वेळी ड्रोन सापडल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी (दि. १३) रात्रीच्या सुमारास घडली. ...

डफळापूर : बेळुंखी (ता.जत) येथे रात्रीच्या वेळी ड्रोन सापडल्याने एकच खळबळ उडाली. ही घटना मंगळवारी (दि. १३) रात्रीच्या सुमारास घडली. जत पोलिसांनी ड्रोन ताब्यात घेतला असून, पुढील तपास सुरू आहे.बेळुंखी येथे मंगळवारी रात्री आठच्या सुमारास पांडुरंग चव्हाण यांच्या मळ्यात आंब्याच्या झाडाखाली ड्रोन पडल्याचे निदर्शनास आले. हा ड्रोन प्लास्टिकचा असून, वजनाला हलका आहे. त्यावर कॅमेरा आहे. त्यावर निळी लाइट आहे. अचानकपणे ड्रोन सापडल्याने बेळुंखी परिसरात एकच खळबळ उडाली. या घटनेची माहिती पोलिस पाटील पंकज शिंगाडे यांनी जत पोलिसांना दिली. जत पोलिसांनी तातडीने दखल घेऊन घटनास्थळी येऊन ड्रोनची पाहणी केली आणि तो ड्रोन ताब्यात घेतला. सध्या भारतपाकिस्तान यांच्यात तणावाचे वातावरण असताना हा ड्रोन सापडल्याने गावात उलटसुलट चर्चा रंगली होती. हा ड्रोन कोणी सोडला, याची अद्याप माहिती कळू शकली नाही. याबाबत जत पोलिस निरीक्षक सतीश कोळेकर यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला असता ते म्हणाले की, या ड्रोनबद्दल नागरिकांनी भीती बाळगू नये. हा प्लास्टिकचा छोटा ड्रोन आहे. त्यावर कॅमेरा व लाइट आहे. या ड्रोनचा मालक कोण आहे व तो का सोडण्यात आला, याची चौकशी सध्या सुरू आहे.

टॅग्स :SangliसांगलीIndiaभारतPakistanपाकिस्तानPoliceपोलिस