शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

Municipal Election 2026: महायुतीचा प्रयत्न; पण राष्ट्रवादीचा वेगळाच सुरू; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2025 19:22 IST

गटबाजी सुरू असल्याच्या चर्चा चुकीच्या

मिरज : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महायुतीचा प्रयत्न सुरू असला तरी सांगलीप्रमाणेच काही ठिकाणी राष्ट्रवादीचे वेगळेच काहीतरी सुरू आहे. आता त्यांनी काय करायचे ते ठरवावे, असे सूचक वक्तव्य पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मिरजेत पत्रकार परिषदेत केले.स्थानिक पातळीवर भाजप व राष्ट्रवादीमधील संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चंद्रकांत पाटील यांनी हे वक्तव्य केले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत मिरजेत १५ माजी नगरसेवकांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार आहे. यात भाजप, काँग्रेस व राष्ट्रवादी शरद पवार गटातील माजी नगरसेवकांचा समावेश आहे. राष्ट्रवादीच्या तुलनेत भाजपमध्ये कमी पक्षप्रवेश होत असल्याच्या प्रश्नावर भाजपमध्ये आवश्यक तेवढे प्रवेश यापूर्वीच झाले असल्याचे त्यांनी सांगितले.राज्यात २९ महापालिका निवडणुकांत भाजप, शिंदेसेना, आरपीआय, जनसुराज्य पक्ष व रयत क्रांती पक्ष यांच्यासोबत महायुती करण्याचा प्रयत्न सुरू असून, त्यासाठी बैठकादेखील सुरू असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.गटबाजी सुरू असल्याच्या चर्चा चुकीच्याराष्ट्रवादीचे आमदार ईद्रीस नायकवडी यांनी महापौर राष्ट्रवादीचाच होणार असा दावा केला आहे. त्यावर चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘महापौर आमचाच होणार, असे प्रत्येकजण म्हणत असतो. मात्र महापौर भाजपचाच होणार, हे विधिलिखित आहे.निवडणूक प्रभारी म्हणून मकरंद देशपांडे यांची नियुक्ती झाल्यानंतर पक्षात गटबाजी सुरू असल्याच्या चर्चाही चुकीची असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी आमदार सुरेश खाडे, सुधीर गाडगीळ, अतुल भोसले, भाजप प्रभारी मकरंद देशपांडे, निवडणूक प्रमुख शेखर इनामदार, भाजप जिल्हाध्यक्ष प्रकाश ढंग, पृथ्वीराज पाटील यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

English
हिंदी सारांश
Web Title : Municipal Election 2026: MahaYuti Efforts, NCP's Separate Strategy, Patil's Hint

Web Summary : Ahead of municipal elections, MahaYuti attempts unity while NCP pursues its own strategy, hinted Minister Patil. Fifteen ex-corporators from BJP, Congress, and NCP (Sharad Pawar faction) will join NCP. Patil clarified MahaYuti, including BJP, Shinde Sena, RPI, aims to contest corporotion elections together. He dismissed rumors of factionalism within BJP.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूक २०२६Mahayutiमहायुतीchandrakant patilचंद्रकांत पाटीलNCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवार