अलमट्टी धरण १०० टक्के भरले, कर्नाटकचे जलसंपदा विभाग म्हणत..
By अशोक डोंबाळे | Updated: August 24, 2022 18:53 IST2022-08-24T18:52:38+5:302022-08-24T18:53:09+5:30
अलमट्टी धरण १०० टक्के भरल्यामुळे कृष्णा नदीकाठच्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

अलमट्टी धरण १०० टक्के भरले, कर्नाटकचे जलसंपदा विभाग म्हणत..
अशोक डोंबाळे
सांगली : अलमट्टी धरणाची पाणी साठवण क्षमता १२३ टीएमसी असून, बुधवारी सायंकाळी ६ वाजता धरणात १२३.०१ टीएमसी पाणीसाठा झाला आहे. धरण १०० टक्के भरल्यामुळे कृष्णा नदीकाठच्या कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. परंतु, कर्नाटक जलसंपदा विभागाने पाऊस कमी झाल्यामुळे धरण भरुन घेतल्याचे स्पष्टीकरण दिले आहे. दरम्यान, कोयना ९४ टक्के, तर वारणा ९७ टक्के भरले आहे.
पश्चिम महाराष्ट्रात पावसाने उघडीप दिली आहे. पण, धरण पाणलोट क्षेत्रात होत असलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्यादृष्टीने महत्त्वाची असलेली कोयना, वारणा, राधानगरी, दुधगंगा, धोम, कण्हेर या धरणांमध्ये ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा झाल्यामुळे शेतकऱ्यांचा रब्बी हंगाम चांगला जाणार आहे. अलमट्टी धरणात १२३.०१ टीएमसी पाणीसाठा असल्याने सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कृष्णा नदीकाठच्या नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. कारण, अलमट्टी धरण ऑगस्टमध्येच १०० टक्के भरले आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील धरणातील पाणीसाठा
धरण क्षमता सध्याचा साठा टक्केवारी
कोयना १०५.२५ ९८.४६ ९४
धोम १३.५० ११.८६ ९५
कण्हेर १०.१० ९.३२ ९२
वारणा ३४.४० ३३.३३ ९७
दुधगंगा २५.४० २२.९१ ९०
राधानगरी ८.३६ ८.३१ ९९
अलमट्टी १२३ १२३.०१ १००