शहरं
Join us  
Trending Stories
1
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
3
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
4
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
5
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
6
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
7
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
8
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
9
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
10
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
11
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
12
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
13
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
14
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
15
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
16
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
17
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
18
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
19
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
20
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

Sangli: शिराळ्यात पारंपरिक नागपंचमीस परवानगी द्या; सत्यजीत देशमुख यांची अमित शाह यांच्याकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 21, 2025 14:17 IST

सकारात्मक निर्णय घेऊ

शिराळा : शिराळा येथील जगप्रसिद्ध नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावे, नागपंचमीच्या दिवशी जिवंत नागाची पूजा करण्याची परवानगी मिळावी, अशी शिराळावासीयांची लोकभावना आहे. तिचा आदर करीत केंद्र सरकारने वन्यजीव कायद्यामध्ये खास बाब म्हणून सुधारणा करून पारंपरिक पद्धतीने नागपंचमी साजरी करण्यासाठी परवानगी मिळावी, अशी मागणी केंद्रीय गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्याकडे आमदार सत्यजित देशमुख यांनी नवी दिल्ली येथे भेट घेऊन केली.यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मतदारसंघातील प्रश्नासंदर्भात पाठपुरावा करीत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी केंद्रीय मंत्री शाह यांना शिराळा विधानसभा मतदारसंघातील विविध मागण्यांचे निवेदन दिले.आमदार देशमुख म्हणाले की, जगप्रसिद्ध शिराळा नागपंचमीस गतवैभव प्राप्त व्हावे, यासाठी खासदार धैर्यशील माने, विधान परिषद आमदार सदाभाऊ खोत, भाजपा जिल्हाध्यक्ष सम्राट महाडिक यांच्यासह याबाबत पाठपुरावा सुरू आहे. नागपंचमी ही हिंदू धर्म, रूढी, परंपरा, आचरणाप्रमाणे साजरी करून मूलभूत अधिकार जपावेत, अशी विनंती केली. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना भारतरत्न पुरस्कार द्यावा, अशी विनंती केली.

सकारात्मक निर्णय घेऊशिराळा येथील एम.आय.डी.सी.मध्ये उद्योग व्यवसाय उभारणीसाठी सहकार्य करावे. जेणेकरून येथील तरुणांना शाश्वत रोजगार उपलब्ध होईल. शिराळा मतदारसंघातून जाणारा पेठ- कोकरूड- मलकापूर- अनुस्कुरा घाट जोडणाऱ्या या मार्गाला राष्ट्रीय महामार्गाचा दर्जा द्यावा. या मार्गांवरून प्रवासी, पर्यटकांना गोवा, मुंबईकडे जाणे सोयीचे होईल, अशा विविध मागण्या निवेदनाद्वारे शाह यांच्याकडे केल्या. यावेळी अमित शाह यांनी मागण्यांबाबत सकारात्मक निर्णय घेऊ, अशी ग्वाही दिली.