शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
3
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
4
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
5
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
6
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
7
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
8
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
9
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
10
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
11
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
12
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
13
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
14
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
15
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
16
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
17
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
18
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
19
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
20
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
Daily Top 2Weekly Top 5

Sangli Municipal Election 2026: पोलीस बंदोबस्तात पैसे वाटपाचा आरोप, मिरजेत अजितदादा-शरद पवार गटाचे कार्यकर्ते भिडले

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2026 15:14 IST

आमदार इद्रिस नायकवडी व अभिजीत हारगे गटात जोरदार वाद 

मिरज : महापालिका निवडणुकीच्या मतदानास दोन दिवस शिल्लक असताना मिरजेत राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सोमवारी दुपारी आमदार इद्रिस नायकवडी यांच्या निवासस्थानाजवळ पैसे वाटपाच्या संशयावरून राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे उमेदवार अभिजीत हारगे व अजितदादा गटाचे आमदार नायकवडी गटातील कार्यकर्त्यांमध्ये जोरदार वादावादी झाली. दोन्ही गटांचे समर्थक जमल्याने काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करत जमाव पांगवला.प्रभाग क्रमांक २० मध्ये राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार अभिजीत हारगे व अजितदादा गटाचे आमदार इद्रिस नायकवडी यांचे पुत्र अतहर नायकवडी यांच्यात लढत आहे. सोमवारी दुपारी आमदार नायकवडी यांच्या घराजवळ मोठी गर्दी जमलेली पाहून अभिजीत हारगे तेथे गेले. त्या ठिकाणी मतदारांना पैसे वाटप सुरू असल्याचा आरोप करत हारगे यांनी निवडणूक आयोगाच्या फिरत्या पथकाकडे व पोलिस प्रशासनाकडे तक्रार केली.या तक्रारीनंतर आमदार नायकवडी व श्वेतपद्म कांबळे यांचे कार्यकर्ते अभिजीत हारगे यांच्या अंगावर धावून आल्याचा आरोप करण्यात आला. यानंतर दोन्ही गटांचे समर्थक आमनेसामने आल्याने वादावादी व धक्काबुक्की झाली. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांनी हस्तक्षेप करत कार्यकर्त्यांना पिटाळून लावले. पोलिस उपअधीक्षक प्राणिल गिलडा यांच्यासह पोलिस पथक घटनास्थळी दाखल झाले.  मतदारांना पैसे वाटप करण्यास आक्षेप घेतल्याने आमदार इद्रिस नायकवडी, त्यांचे कार्यकर्ते तसेच अंगरक्षक माझ्या अंगावर धावून आले. पोलिस बंदोबस्तातच पैसे वाटप सुरू होते, असा  आरोप अभिजीत हारगे यांनी केला. तसेच याबाबत तक्रारी ची दखल घेण्यासाठी निवडणूक विभागाचे अधिकारी व प्रशासनातील कोणताही अधिकारी घटनास्थळी आला नसल्याचेही त्यांनी सांगितले...त्यामुळे मतदार आमच्याकडे येतात - नायकवडी आमच्यावर केलेले आरोप  चुकीचे आहेत. प्रत्येक घरापर्यंत आमचा मतदारांची थेट संपर्क असल्यामुळे आम्हाला कधीही पैसे वाटण्याची वेळ आली नाही. निवडणुकीमध्ये मतदार यादीत बराच घोळ  आहे. मतदारांना त्यांची नावे कोणत्या प्रभागामध्ये आहे हे त्यांना समजत नाही त्यासाठी ते आमच्याकडे येतात. आमचे कार्यकर्ते त्यांना त्यांची नावे कोणत्या प्रभागात आहेत हे शोधून देतात. मात्र विरोधी उमेदवारानी आमच्या घरासमोर येऊन दमदाटी केल्याचा दावा आमदार इद्रिस नायकवडी यांनी केला.

English
हिंदी सारांश
Web Title : Sangli Election: Allegations of Bribery Spark Clash Between Rival Factions

Web Summary : Miraj witnessed tensions as Pawar and Ajit Pawar factions clashed over alleged bribery during the Sangli municipal election. Accusations flew, leading to heated arguments and minor scuffles, prompting police intervention to restore order. An investigation is underway.
टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Electionमहानगरपालिका निवडणूक २०२६NCPराष्ट्रवादी काँग्रेसAjit Pawarअजित पवारSharad Pawarशरद पवार