शहरं
Join us  
Trending Stories
1
Census 2027 : केंद्र सरकारकडून जनगणनेची अधिसूचना जारी! ३५ लाखांहून अधिक कर्मचारी काम करणार, अ‍ॅपचा वापर होणार
2
'अनेक वळा लोक अशा गोष्टींकडे लक्ष देत नाहीत', कुंडमळ घटनेबद्दल CM फडणवीसांनी मांडली भूमिका
3
एअर इंडियाच्या आणखी एका विमानात बिघाड; फ्लाईटने हवेतून यु-टर्न घेतला, हाँगकाँगला गेले
4
"इराणने मला जिवे मारण्याचा प्रयत्न केला, बेडरूमवर डागलं क्षेपणास्त्र’’, इस्राइलचे पंतप्रधान नेतन्याहू यांनी केला दावा   
5
टाटा मोटर्सचे शेअर्स ५% ने घसरले, जर तुम्हीही गुंतवणूक केली असेल तर 'ही' महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या
6
Kedarnath Helicopter Crash:'हेलिकॉप्टर थोडे वळले, मागे गेले आणि मग...', केदारनाथ हेलिकॉप्टर अपघाताचे खरे कारण समोर आले
7
अमृता सुभाष अन् अनिता दातेच्या 'जारण'ची वाढती लोकप्रियता, १० दिवसातली कमाई किती?
8
Air India Plane Crash: ९२ जणांचे DNA नमुने जुळले, पण ८७ जणांचीच पटली ओळख; कारण...
9
संजय कपूरच्या निधनानंतर करिश्माला बसणार मोठा फटका! दर महिन्याला मिळणारी रक्कम होणार बंद?
10
'पाकिस्तान इस्रायलवर अणु बॉम्ब टाकेल', इराणी अधिकाऱ्याच्या दाव्यानंतर पाक स्पष्टच बोलला!
11
Israel Iran War: इस्रायलचा इराणवर बॉम्बवर्षाव; ४०६ जण ठार!
12
Govandi Accident: ‘मुझे अब पापा कौन कहेंगे?’ गोवंडी अपघातात मुलांना गमावलेल्या वडिलांनी फोडला टाहो!
13
Maharashtra Rain Alert: रेड अलर्ट! महाराष्ट्रातील 'या' जिल्ह्यांना अत्यंत मुसळधार पावसाचा इशारा
14
Lufthansa Hyderabad Flight : 'Lufthansa'च्या विमानाला हैदराबादमध्ये उतरण्याची परवानगी नाकारली, जर्मनीला परतलं; नेमकं प्रकरण काय?
15
Mumbai: गिरगावमध्ये रस्त्याला भगदाड, बेस्ट बस पाच फूट खोल खड्यात, व्हिडीओ बघा
16
Astrology: जुलैअखेर पर्यंत अस्मानी-सुलतानी संकटांचे सावट; दररोज करा 'हे' उपाय!
17
काय आहे लोडिंग फॅक्टर, घर घेताना अनेकदा तुमच्यापासून लपवून ठेवतात लोक; मोठ्या प्रमाणात होतं नुकसान
18
ST Bus Pass: सरकारनं विद्यार्थ्यांना केलं खूश, एसटी पासबाबत घेतला महत्त्वाचा निर्णय
19
डोनाल्ड ट्रम्प यांनी वर्षभरात कमावले ₹५,१०० कोटी, कुठून आला त्यांच्याकडे इतका पैसा?
20
इराण-इस्रायल संघर्षामुळे पाकिस्तानवर रडण्याची वेळ! पेट्रोल-डिझेलचे भाव भडकले, काय आहेत दर?

Sangli: शिराळा तालुक्यातील सर्व शाळा झाल्या तंबाखुमुक्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2025 15:30 IST

ऑनलाइन पद्धतीने प्रमाणपत्र : तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करण्याचे समुपदेशन

शिराळा : शिराळा तालुक्यातील जिल्हा परिषदेच्या एकूण १४७ शाळा, खासगी प्राथमिकच्या १८, माध्यमिकच्या ४९ तर उच्च माध्यमिकच्या ३ अशा २१७ शाळा तंबाखूमुक्त शाळा उपक्रमांतर्गत तंबाखुमुक्त झाल्या आहेत. शासकीय संस्थांसह शाळांच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थांच्या होणाऱ्या विक्रीमुळे विद्यार्थ्यांना त्याचे व्यसन जडण्याची शक्यता असते. ही बाब लक्षात घेत महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सलाम फाउंडेशन, मुंबई यांच्या सहकार्यातून ''तंबाखूमुक्त शाळा'' हा उपक्रम सुरू करण्यात आला आहे.शाळांमधूनच देशाची भावी संस्कारक्षम पिढी घडत असते. यासाठीच शालेय शिक्षण, आरोग्य विभागाच्या संयुक्त विद्यमाने सलाम फाउंडेशन, मुंबई यांच्या सहकार्यातून धूम्रपान, मद्यपान आदी व्यसन प्रवृत्तीपासून ती दूर राहावीत, यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. शाळांमध्ये तंबाखूमुक्त शाळा, परिसर उपक्रम राबविला जातोय. शाळा, शाळा परिसर हा तंबाखूमुक्त असावा, यासाठी तंबाखूमुक्त शाळा या उपक्रमांतर्गत प्रत्येक शाळेच्या आवारात जनजागृतीचे फलक लावण्यात आले आहेत.ज्या शाळा तंबाखूमुक्तीचे ११ निकष पूर्ण करतील, अशा शाळांना तंबाखूमुक्त म्हणून घोषित केले गेले आहे. त्यांना तसे प्रमाणपत्रही ऑनलाइन पद्धतीने दिले गेले आहे. अनेक उपक्रम शाळा स्तरांवर राबवलेत, त्याची जनजागृतीही केली गेली आहे. तालुक्यातील सर्वच शाळांमध्ये तंबाखूजन्य पदार्थ, त्यांचे सेवन नकरणाऱ्यांचे समुपदेशन नुकतेच केले गेले होते.

शालेय जीवनातील विद्यार्थी, महाविद्यालयीन युवकांमध्ये तंबाखू आणि तंबाखूमुळे होणाऱ्या दुष्परिणामांची तसेच मौखिक कर्करोगाबद्दल जनजागृती, त्याचा प्रचार, प्रसार करण्यावर विशेषतः तालुक्यातील सर्वच शाळेतील शिक्षकवृंदांनी भर दिला होता. त्यामुळे तालुक्यातील सर्वच शैक्षणिक संस्था तंबाखूमुक्त झाल्या आहेत. - पोपटराव मलगुंडे गटशिक्षणाधिकारी, शिराळा.

टॅग्स :SangliसांगलीSchoolशाळा