शहरं
Join us  
Trending Stories
1
RCBच्या रोमहर्षक विजयानंतर विराट कोहली रडला अन् अनुष्का शर्माही... Video Viral 
2
RCB चा प्ले ऑफमध्ये प्रवेश पक्का; रचीनचा Run Out अन् ड्यू प्लेसिसच्या स्टनर कॅचने फिरला सामना 
3
प्रज्वल रेवण्णांच्या अडचणीत वाढ, ब्लू कॉर्नर नोटीसनंतर अटक वॉरंट जारी
4
आग्र्यात बूट व्यावसायिकांच्या घरावर छापा, सापडलं कोट्यवधींचं घबाड; नोटांचे बंडल पाहून अधिकारीही चक्रावले
5
आम्ही भाजपावाले आहोत, आम्हाला घाबरणं माहिती नाही, पाकव्याप्त काश्मीरचा ताबा मिळवणारच- अमित शाह
6
"संविधानाचे रक्षण करणे हेच आमचे ध्येय, कारण...", राहुल गांधींचा भाजपावर हल्लाबोल
7
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
8
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
9
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
10
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
11
Ruturaj Gaikwad च्या विकेटवर अनुष्का शर्माचं भन्नाट सेलिब्रेशन जणू जिंकला सामना  
12
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
13
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
14
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
15
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
16
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
17
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
18
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
19
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
20
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...

अजित पवारांचे सांगलीकरांना मोठे आश्वासन, अधिकाऱ्यांना दिल्या महत्वपूर्ण सूचना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 2:11 PM

Sangli Flood: 'उद्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेऊन योग्य तो निर्णय घेतला जाईल.'

ठळक मुद्देसायंकाळी 5.30 वाजता सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन.

सांगली: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज सांगली जिल्ह्यातल्या पूरग्रस्त भागाची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्तांची संवाद साधून त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. सांगलीतील पलूस तालुक्यातील भिलवडी येथील पूर परिस्थितीची पाहणी करताना महिलांनी अजित पवारांकडे पुनर्वसन करण्याची मागणी केली. त्यावर अजित पवारांनी त्या महिलांना पुनर्वसन करण्याचे आश्वासन दिले. या पाहणीदरम्यान अजित पवारांसोबत जलसंपदा मंत्री तथा सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री जयंत पाटील, मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, कृषी राज्यमंत्री विश्वजीत कदम उपस्थित होते.

अजित पवारांनी भिलवडी गावातील पुरग्रस्तांच्या व्यथा ऐकल्यानंतर त्यांच्या पुनर्वसन आणि मदतीसाठी चांगला मार्ग काढण्याचे आश्वासन दिले. तसेच, संकटाच्या काळात राज्य सरकार प्रत्येक नागरिकाच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याची ग्वाहीदेखील दिली. यावेळी त्यांनी भिलवडी परिसरातील ज्या घरांना आणि रहिवाशांना वारंवार पुराचा फटका बसतो अशा घरांचा सर्व्हे करा आणि वारंवार पुराचा फटका बसणाऱ्या घरांचे उंचावरील जागेवर पुनर्वसन करण्यासाठी जागेची उपलब्धता तातडीने तपासा, अशा सूचना प्रशासकीय अधिकाऱ्यांना दिल्या. विशेष म्हणजे, भिलवडी येथील बाजारपेठ पुर्णपणे पाण्याखाली आहे, पाणी भरलेल्या बाजारपेठेची उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बोटीतून जाऊन पाहणी केली. 

खराब वातावरणामुळे कोल्हापूर दौरा रद्दअजित पवार आज कोल्हापूर दौऱ्यावर जाणार होते. पण, काही तांत्रिक अडचणीमुळे त्यांचा कोल्हापूर दौरा रद्द करण्यात आला. याबाबत सांगाताना ते म्हणाले की, हेलिकॉप्टर उड्डाण घेत नसल्याने मी कोल्हापूर दौरा रद्द करुन सांगलीला आलोय. इथे पूरपरिस्थितीची पाहणी करून पूरग्रस्तांच्या व्यथा ऐकून अधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. उद्या मुख्यमंत्री यांच्यासोबत बैठक असून त्या बैठकीत या सर्व परिस्थितीचा आढावा मांडून आम्ही योग्य तो निर्णय घेणार असल्याचेही अजित पवारांनी सांगितले. दरम्यान, आज सांगलीत उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री विजय वडेट्टीवार यांची पूरग्रस्तांच्या मदत आणि पुर्नवसनाच्या अनुषंगानं आज महत्वाची आढावा बैठक होणार आहे. सायंकाळी 5.30 वाजता सांगलीतील जिल्हाधिकारी कार्यालयात ही बैठक होईल.  

टॅग्स :floodपूरSangliसांगलीRainपाऊसAjit Pawarअजित पवार