शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

महापालिका निवडणुकीत अजितदादा महायुतीबरोबरच : चंद्रकांत पाटील

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 14:16 IST

सोयीच्या आघाड्या नसतील

सांगली : नगरपालिका संख्या जास्त असल्यामुळे आणि पक्षाच्या सर्व कार्यकर्त्यांना संधी देणे शक्य न झाल्यामुळे कुठे महायुती आणि अनेक ठिकाणी स्थानिक आघाडीसाठी सर्वच पक्षांना सवलत दिली होती. त्यामुळे सांगली जिल्ह्यात काही ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेसने शरद पवार पक्षाबरोबर आघाडी केली होती. मात्र, महापालिका निवडणुका महायुती म्हणूनच लढविण्याचा निर्णय झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवारही महायुतीतच असणार आहेत, अशी स्पष्ट भूमिका भाजपचे नेते आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मांडली.सांगलीत शुक्रवारी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक झाली. या बैठकीनंतर पालकमंत्री पाटील यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी ते बोलत होते. चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘नगरपालिका निवडणुकांमध्ये स्थानिक इच्छुक कार्यकर्त्यांची संख्या जास्त असते. या निवडणुकांमध्ये सर्व कार्यकर्त्यांना संधी देणे शक्य नाही. त्यामुळे कुठे महायुती तर कुठे स्थानिक नेत्यांना आघाडी करण्याबाबत अधिकार दिले होते. यामुळे सांगली जिल्ह्यातील जत, शिराळा येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाशी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीने आघाडी केली होती. काही ठिकाणी भाजपनेही स्थानिक आघाड्या केल्या होत्या. नगरपालिका निवडणुका संपल्यामुळे आता महायुती म्हणून महापालिका, जिल्हा परिषद निवडणुका होणार आहेत. त्यादृष्टीने महायुतीच्या नेत्यांचीही बैठक झाली आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीत अजित पवारांचा पक्ष महायुतीसोबतच असेल. कोणत्याही प्रकारची स्थानिक आघाडी होणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Sangli Miraj Kupwad Municipal Corporation Electionसांगली मिरज कुपवड महानगरपालिका निवडणूक २०२६SangliसांगलीMunicipal Corporationनगर पालिकाMunicipal Electionमहानगरपालिका - नगरपालिका निवडणूकchandrakant patilचंद्रकांत पाटीलAjit Pawarअजित पवारMahayutiमहायुती